IND vs SA: भारतीय संघात परतण्यासाठी केएल राहुलची धडपड, जीममध्ये घाम गाळतानाचा व्हिडिओ समोर
KL Rahul: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA T20 Series) यांच्यातील पाच सामन्याच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळण्यात आला.
KL Rahul: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA T20 Series) यांच्यातील पाच सामन्याच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळण्यात आला. या सामन्यात भारताला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) यांसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. ज्यामुळं या मालिकेत केएल राहुल (KL Rahul) भारतीय संघाचं नेतृत्व करणार असल्याची बीसीसीआयनं घोषणा केली होती. परंतु, टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वी एक दिवस आधी केएल राहुलला दुखापतीमुळं मालिकेतून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर ऋषभ पंतकडं टी-20 मालिकेचं नेतृत्व सोपवण्यात आलं.
कमबॅकसाठी केएल राहुल सज्ज
दरम्यान, कंबरेच्या दुखापतीमुळं केएल राहुल भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतून बाहेर पडावं लागलंय. परंतु, त्यानं मोठ्या ताकदीनं भारतीय संघात पुनरागमन करण्याचा निर्धार केलाय. राहुलनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये तो जिममध्ये घाम गाळताना दिसतोय. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये केएल राहुलनं "सेटबॅक < कमबॅक" असं लिहलं आहे.
आयपीएल 2022 मध्ये केएल राहुलचं दमदार प्रदर्शन
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात केएल राहुलनं दमदार प्रदर्शन करून दाखवलं. त्यानं 15 सामन्यात 51.33 च्या सरासरीनं आणि 135.38 च्या स्ट्राईक रेटनं 616 धावा केल्या. एवढेच नव्हेतर, आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. या हंगामात त्यानं दोन शतक आणि चार अर्धशतकं झळकावली आहेत. राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सनं आपल्या पदार्पणाच्या हंगामात चमकदार कामगिरी करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं.
भारताचा सात विकेट्सनं पराभव
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना दिल्ली येथे खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं 20 षटकात दक्षिण आफ्रिकेसमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं तुफानी फलंदाजी केली. ज्यामुळं दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 19.1 षटकातचं लक्ष्य गाठलं. रासी व्हॅन डर डसेन (46 चेंडूत 75 धावा) आणि डेव्हिड मिलर (31 चेंडूत 64 धाव) दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
व्हिडिओ-
हे देखील वाचा-
- Watch Video: बाबर आझममुळं रन आऊट झाल्यानंतर इमाम-उल-हकचा संयम तुटला, भरमैदानातचं त्यानं...
- Indonesia Masters 2022: इंडोनेशिया ओपनमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत पराभूत
- आयपीएलनंतर आता आर. अश्विन खेळू शकतो या लीगमध्ये, भारतीय संघालाही होईल यामुळे फायदा