एक्स्प्लोर

Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या, सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं?

Maharashtra Budget Session 2025: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बहुतांश कालावधी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन निर्माण झालेल्या वादात गेला. यानंतर सभागृहात दिशा सालियन आणि कुणाल कामराचे प्रकरण गाजले.

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता होणार आहे. मात्र, या अधिवेशनातून सर्वसामान्यांना काय मिळालं आणि काही नाही मिळालं असा प्रश्न समोर येतोय. महायुती सरकारला मोठया प्रमाणावर बहुमत मिळाल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प होता. त्यामुळे केलेल्या घोषणा किती पूर्ण होतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर या अधिवेशनात संविधानावर तब्बल दोन दिवस चर्चा करण्यात आली. औरंगजेबाची कबर, दिशा सालियन प्रकरण या सगळ्या वादांमध्ये यंदाच्या अधिवेशनातून सर्वसामान्यांना काय मिळालं, हा प्रश्न अनुत्तरित राहिला होता. या अधिवेशनात लाडक्या बहि‍णींच्या अनुदानाची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्या घोषणा झाल्या नाहीत?

1. विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडक्या बहिण योजनेचे 1500 रुपयांवरुन 2100 रुपयांचे करण्याच आश्वासन दिलेले होतं. मात्र, या अर्थसंकल्पात या संदर्भात घोषणा होऊ शकली नाही. 

2. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा निवडणूक काळात दिलेली होती. मात्र या अर्थसंकल्पात ही घोषणा होऊ शकली नाही.

3. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना  (लाडका भाऊ) ही 11 महिन्यांच्या पुढे भत्ता मिळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला 


4. निवडणुकीच्या आधी केलेल्या मोठया घोषणांसाठी वेगळ्या निधीची तरतुद अर्थसंकल्पात पाहायला मिळाली नाही. 

अधिवेशनात कोणत्या मोठया घोषणा झाल्या?

1. एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता 'स्टील हब' म्हणून उदयास येत असल्याची घोषणा

2. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-1 ची कामे पूर्णत्वास आली असून टप्पा-2 अंतर्गत 9 हजार 610 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दर्जोन्नतीची कामे मार्च, 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन

3. सर्वांसाठी घरे' हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार. राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. या सर्व घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसविण्यात येणार

4. कृषि क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता' तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल. येत्या दोन वर्षात त्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार

5. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 818 गावांमध्ये 4 हजार 227 कोटी रुपये किंमतीची 1 लाख 48 हजार 888 कामे हाती. अभियानातील सर्व कामे मार्च, 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार

6. नदीजोड प्रकल्पा अंतर्गत वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत: मान्यता देण्यात आली.  या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोलाबुलढाणा या सहा जिल्हयांना होणार आहे. प्रकल्पाची सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरू

7. महाराष्ट्रातील आगामी विमानतळांच्या धोरणाबाबत- शिर्डी विमानतळाच्या 1 हजार 367 कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली असून ती कामे सुरु आहेत. रत्नागिरी विमानतळाची 147 कोटी रुपये रकमेची कामे प्रगतीपथावर आहेत.

8. यासह अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून तेथून 31 मार्च, 2025 पासून प्रवासी सेवा सुरु करण्याचे नियोजन 

9. अनुसूचित जाती उपयोजनेच्या तरतुदीत 42 टक्के भरीव वाढ केल्याची घोषणा 

10. वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी. महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे.

11. नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच नव-उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे, यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारण्यात येणार

12. वाढवण येथे तिसरे विमानतळ - जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरित्या पालघर जिल्ह्यात ‘वाढवण बंदर’ विकसित कर‍ित आहेत. या प्रकल्पाचा एकूण खर्च 76 हजार 220 कोटी रुपये असून त्यात राज्य सरकारचा सहभाग 26 टक्के आहे. 

आणखी वाचा

जयकुमार गोरेंना 22 वर्षांची मुलगी, तिला काय वाटत असेल? फडणवीसांच्या प्रश्नाने सभागृहातील सगळेच निरुत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Navneet Rana Sunetra Pawar: नवनीत राणा अन् सुनेत्रा पवारांची भेट; राज्यसभा सीट मिळण्यासाठी फिल्डींग, अमोल मिटकरींची अस्वस्थता, तर छगन भुजबळांच्या नावाचीही चर्चा, घडामोडींना वेग
नवनीत राणा अन् सुनेत्रा पवारांची भेट; राज्यसभा सीट मिळण्यासाठी फिल्डींग, अमोल मिटकरींची अस्वस्थता, तर छगन भुजबळांच्या नावाचीही चर्चा, घडामोडींना वेग
Vaibhav Naik : वैभव नाईक यांच्या मागे पुन्हा एसीबीकडून चौकशीचा सासेमीरा; रत्नागिरी ACB कार्यालयानं कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र धाडलं, नेमकं प्रकरण काय?
वैभव नाईक यांच्या मागे पुन्हा एसीबीकडून चौकशीचा सासेमीरा; रत्नागिरी ACB कार्यालयानं कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र धाडलं, नेमकं प्रकरण काय?
Cockroach Janta Party Abhijeet Dipke: मोठी बातमी: कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पोलिसांची परवानगी, अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवताच मोठं यश
कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पोलिसांची परवानगी, अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवताच मोठं यश

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Embed widget