एक्स्प्लोर

Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

Kartik Purnima 2024 Lucky Zodiacs : कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा श्रीहरीला समर्पित आहे. यावर्षी कार्तिक पौर्णिमेला एक अद्भुत योग निर्माण होत आहे, ज्याचा फायदा 3 राशींना होणार आहे. या राशींना लवकरच सोन्याचे दिवस येतील.

Kartik Purnima 2024 Lucky Zodiacs : कार्तिक पौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेच्या (Kartik Purnima 2024) दिवशी शंकर आणि विष्णूची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा नाश करून सर्व देवतांना त्याच्या दहशतीपासून वाचवलं होतं. त्यामुळे हा दिवस हिंदू धर्मात विशेष मानला जातो. या दिवशी विष्णू पूजा, दान आणि गंगा स्नान केल्याने सर्व समस्या दूर होतात आणि जुनी पापं नष्ट होतात, अशी मान्यता आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, यंदा कार्तिक पौर्णिमेला अनेक शुभ योग घडत आहेत. काही राशीच्या लोकांना या योगांचा विशेष फायदा होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

कार्तिक पौर्णिमेला जुळून आले अनेक शुभ योग

ज्योतिष शास्त्रानुसार, यावेळी कार्तिक पौर्णिमेला विशेष शुभ योग तयार होत आहेत. यंदा कार्तिकी पौर्णिमा 15 नोव्हेंबरला आहे. 15 नोव्हेंबरला मंगळ कर्क राशीत भ्रमण करत आहे, कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. तर या दिवशी चंद्र मेष राशीत भ्रमण करत आहे, मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. अशाप्रकारे कार्तिक पौर्णिमेला मंगळ आणि चंद्राचं राशी परिवर्तन होत आहे. तसेच यासोबत गजकेसरी योग (Gajkesari Yog) आणि बुधादित्य राजयोग (Budhaditya Rajyog) देखील तयार होत आहेत. याशिवाय कार्तिक पौर्णिमेला षष्ठ राजयोगही (Shash Rajyog) तयार होत आहे.

15 नोव्हेंबरपासून 'या' राशींना सोन्याचे दिवस

मेष रास (Aries)

कार्तिक पौर्णिमेचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे. या दिवसापासून तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. नातेसंबंध सुधारतील. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. व्यवसायातही अपार लाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी हा दिवस चांगला आहे. या दिवसापासून ग्रहांची स्थिती बदलल्यामुळे तुमची प्रत्येक कामं पूर्ण होऊ शकता. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल. नात्यात गोडवा येईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकतं. आर्थिक लाभ होऊ शकतो.

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी कार्तिक पौर्णिमा भाग्याची ठरेल. 15 नोव्हेंबरपासून तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. या दिवसापासून तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदारासोबतचे संबंधही सुधारतील. या दिवशी धार्मिक कार्यात सहभाग घेणं फायदेशीर ठरू शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shani Gochar : 2025 मध्ये शनीचा सोनपावलांनी मीन राशीत प्रवेश; 3 राशींचं नशीब लखलखणार, नवीन नोकरीसह अपार धनलाभाचे संकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget