एक्स्प्लोर

Indonesia Masters 2022: इंडोनेशिया ओपनमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि युवा खेळाडू लक्ष्य सेन  (Lakshya Sen) यांना शुक्रवारी इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.

Indonesia Masters 2022: दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि युवा खेळाडू लक्ष्य सेन  (Lakshya Sen) यांना शुक्रवारी इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. ज्यामुळं भारताचं आव्हान संपुष्टात आलंय. सेनला चायनीज तैपेईच्या चाऊ तिएन चेननं (Chou Tien-chen) पराभूत केलं. तर, सिंधूला थायलंडच्या रचानोक इंतानॉनकडून 12-21, 10-21 ने पराभव पत्करावा लागलाय.

पीव्ही सिंधुची निराशाजनक कामगिरी
इंतानोननं अतिशय आक्रमक खेळ केला आणि अर्ध्या तासात सामन्याचा निकाल लागला. पहिल्या ब्रेकपर्यंत इंतानोननं 11-5 अशी भक्कम आघाडी घेतली. या कालावधीत सिंधूला केवळ दोन गुण करता आले. बीडब्ल्यूएफ सुपर 500 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी थायलंडचा शटलर इंतानोननं कॉर्नर आणि डिप शॉट्सचा चांगला उपयोग केला. महत्वाचं म्हणजे, 2013 च्या विश्वविजेत्या इंतानोनविरुद्ध सिंधूचा हा सलग पाचवा पराभव होता. तर, सिंधुनं इतानोनंसह आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत. त्यापैकी 13 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. 

लक्ष्य सेनचा पराभव
इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धेतून उपांत्यपूर्व फेरीत भारताचा युवा शटलर लक्ष्य सेनला चिनी तैपेईच्या चाऊ तिएन चेनकडून पराभव स्वीकारावा लागलाय. जागतिक चॅम्पियनशिपच्या कांस्यपदक विजेता लक्ष्य सेनला चाऊ तिएन चेननं 21-16, 12-21, 21-14 अशा फरकानं पराभूत केलंय. थॉमस चषकानंतर लक्ष्य सेनची ही दुसरी स्पर्धा होती. त्यानं  थायलँड ओपनमधून ब्रेक घेतला होता. 

या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये लक्ष्य सेनला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये चाऊ तिएन चेनला पराभूत करून लक्ष्य सेननं जोरदार कमबॅक केलं. मात्र, अखेरच्या आणि निर्णायक सेटमध्ये लक्ष्य सेनचा पराभव झाला. निर्णायक सेटमध्ये सलग तीन गुण मिळवून ब्रेकपर्यंत सहा गुणांची आघाडी घेतली आणि नंतर ती कायम ठेवली. सेननं दोन मॅच पॉइंट वाचवले. पण त्याला चाऊला विजयापासून रोखता आलं नाही.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd Test DAY-2 Stump : न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची दाणादाण! आकाश दीप चमकला, पण फलंदाजांची शरणागती; दिवसभरात नेमकं काय काय घडलं?
न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची दाणादाण! आकाश दीप चमकला, पण फलंदाजांची शरणागती; दिवसभरात नेमकं काय काय घडलं?
Suryakumar Yadav News : मुंबईची मोठी घोषणा! सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणार टीम इंडियाचा कॅप्टन, श्रेयस अय्यरसह 17 जणांचा चक्रावून टाकणारा Squad जाहीर
मुंबईची मोठी घोषणा! सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणार टीम इंडियाचा कॅप्टन, श्रेयस अय्यरसह 17 जणांचा चक्रावून टाकणारा Squad जाहीर
Mumbai Indians IPL 2027 : रोहित शर्मा कर्णधार होताच मुंबई इंडियन्समध्ये नवा ट्विस्ट! हिटमॅनचा राइट हँड होण्यास बुमराहचा थेट नकार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
रोहित शर्मा कर्णधार होताच मुंबई इंडियन्समध्ये नवा ट्विस्ट! हिटमॅनचा राइट हँड होण्यास बुमराहचा थेट नकार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
बांगलादेशला लोळवलं, पाकिस्तान थेट फायनलमध्ये! भारताला हरवणाऱ्या श्रीलंकेशी भिडणार, आशिया कपचा अंतिम सामना कुठे अन् किती वाजता रंगणार? जाणून घ्या A टू Z
बांगलादेशला लोळवलं, पाकिस्तान थेट फायनलमध्ये! भारताला हरवणाऱ्या श्रीलंकेशी भिडणार, आशिया कपचा अंतिम सामना कुठे अन् किती वाजता रंगणार? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar on Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
डिलिमिटेशन विधेयकावर सुनेत्रा पवारांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; शरद पवारांच्या पक्षाच्या पाठिंब्याच्या प्रश्नावर घेतला काढता पाय, बारामतीत नेमकं काय घडलं?
Rohit Pawar: तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
तेव्हा देखील नातं बाजूला ठेवून लढलो, आताही तेच करणार; रोहित पवारांची सूचक पोस्ट, सत्तेत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम
Sanjay Raut on Amol Kolhe: अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज,
अमोल कोल्हे कसे जिंकतात तेच बघतो, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज, "शरद पवारांच्या बेईमान राष्ट्रवादीला महाराष्ट्राची ताकद दाखवू'
Sanjay Raut on Delimitation Bill 2026 : पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
पक्ष फोडला, शरद पवारांचं कुटुंब फोडलं, त्याच्या चरणाशी जाणं हा स्वाभिमान....; शरद पवारांच्या नेत्यांच्या डिलिमिटेशनच्या समर्थनावर संजय राऊतांची आगपाखड
Krishnaraj Mahadik on Abhijeet Dipke : 'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
'यांना लाज वाटली पाहिजे'; सीजेपी अन् अभिजीत दिपकेंवर कृष्णा महाडिक बरसले, नेमकं काय आहे प्रकरण?
Sharad Pawar and Gautam Adani: शरद पवार- गौतम अदानींची तब्बल 2 तास भेट, ब्रीच कँडी रुग्णालयात प्रकृतीची विचारपूस, नेमकं काय घडलं?
शरद पवार- गौतम अदानींची तब्बल 2 तास भेट, ब्रीच कँडी रुग्णालयात प्रकृतीची विचारपूस, नेमकं काय घडलं?
Residential Encroachments on Govt Land: फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या हालचालींना वेग
Sharad Pawar NCP delimitation bill: राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेल्या राहुल गांधींचा फोटो अन्....
राष्ट्रवादीच्या गोटातून ज्याची भीती होती 'ती' बातमी बाहेर आली, काँग्रेसची इमोशनल पोस्ट, शरद पवारांचा हात घट्ट पकडलेले राहुल गांधींचा फोटो अन्....
Embed widget