लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
Aishwarya Rai : लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? असा सवाल अभिनेत्री ऐश्वर्या रायला विचारण्यात आला होता.

Aishwarya Rai : सध्याच्या आधुनिक जगात प्रेमाबाबत विचार करत असताना लोकांच्या विचारात मोठे बदल झालेले पाहायला मिळतात. लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? याबाबत समाजात वेगवेगळे विचार प्रवाह आहेत. काही लोक याला व्यक्तिगत प्रश्न असल्याचे म्हणतात. मात्र, काही लोक हे भारतीय परंपरेच्या विरोधात असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? या प्रश्नाचं अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिने दिलं होतं.
काय म्हणाली होती ऐश्वर्या राय?
ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) म्हणाली होती की, भारतीय समाजात लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे निषिद्ध मानले होते. त्यामुळे ऐश्वर्या रायने भारतीय परंपरेला जास्त महत्त्व दिल्याची चर्चा रंगली होती.
ऐश्वर्याच्या (Aishwarya Rai) मतानुसार, हे पूर्णपणे व्यक्तीच्या विचारसरणीवर संस्कृतीवर आणि वैयक्तिक श्रद्धांवर अवलंबून असते. लग्नाआधी शारीरिक जवळीक पूर्णतः योग्य की अयोग्य हे ठरवणे हा विचार करण्यासारखा विषय आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नये. तुमच्या नात्यामध्ये परस्पर आदर राखा आणि लग्नापूर्वी तुम्ही शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर प्रत्येक पैलू लक्षात ठेवा.
भारतात लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे योग्य मानले जात नाही - ऐश्वर्या राय
एका मुलाखतीत ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) म्हणाली होती की, भारतात लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे योग्य मानले जात नाही. त्यांच्या मते भारतीय समाजात नातेसंबंधांना कुटुंब आणि समाजाच्या नजरेतून पाहिले जाते. बहुतेकदा लोक अशा विषयावर उघडपणे चर्चा करणे टाळतात कारण तो एक अतिशय वैयक्तिक प्रश्न मानला जाऊ शकतो लग्नापूर्वी शारीरिक संबंध हा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र असा निर्णय भारतीय परंपरेला साजेसा नाही.
सध्याच्या काळात जेव्हा बहुतेक लोक लग्नाआधी रिलेशनशिपमध्ये असतात तेव्हा हा प्रश्न खूप चर्चेचा विषय बनतो. शारीरिक संबंध योग्य की अयोग्य हे ठरवण्यासाठी वैयक्तिक विचार आणि नैतिक मूल्यांवर अवलंबून राहावे लागते. लग्नापूर्वी शारीरिक जवळीकीचे काही सकारात्मक परिणाम तर काही नकारात्मक परिणाम दिसून येतात. प्रत्येक नात्यात, ते जोडप्यांवर अवलंबून असते की ते शारीरिक संबंधांकडे सकारात्मक किंवा नकारात्मक पैलूंकडे पाहतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
