एक्स्प्लोर

संतोष निखळ आहे, सध्या खूप ट्रोल होतोय, पण त्याला चुकीचा समजू नका; जुवेकरसाठी धनंजय पोवारची पोस्ट

Santosh Juvekar : रिलस्टार धनंजय पोवार याने अभिनेता संतोष जुवेकर याच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे.

Santosh Juvekar : छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित छावा या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिकेत असलेला आणि लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या छावा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतील कलाकार संतोष जुवेकर यानेही काम केलंय. दरम्यान, चित्रपटाच्या यशानंतर संतोष जुवेकरने अनेक मुलाखती दिल्या. या मुलाखतीत त्याने अभिनय करत असताना अक्षय खन्नाला औरंगजेब समजून त्याच्याशी बातचित देखील केली नाही, असं वक्तव्य केलं. त्यानंतर तो सोशल मीडियावर तुफान ट्रोल झालाय. दरम्यान, संतोष जुवेकर ट्रोल झालेल्या असताना रिल स्टार धनंजय पोवार आणि सिंगर अवधुत गुप्ते यांनी त्याच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. 

धनंजय पोवार म्हणाला, Santosh  ला मी खूप वर्षं पासून ओळखतो तो मनाने खूप निखळ आहे सध्या ट्रोल होतोय पण तुम्ही त्याला चुकीचा समजू नको खूप सध्या विचारांचा आहे. मनाने पूर्ण मराठी संस्कृती जपणारा आहे  …  आय होप तुम्ही सगळेच हे बंद करालं... 

अवधुत गुप्ते याची पोस्ट जशीच्या तशी 

मित्रांनो!
सर्वप्रथम माझा मित्र संतोष जुवेकर ह्याचे ‘छावा‘ ह्या चित्रपटातील काम बघून तुम्ही जी त्याची स्तुती केलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद!! आता.. गेल्या दोन आठवड्यांपासून त्याला जे ट्रोल करता आहात त्याबद्दल थोडसं.."अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत असल्यामुळे मला त्याच्याशी बोलावसंच वाटलं नाही" हे त्याचं वक्तव्य कुणालातरी खरोखरच हास्यास्पद वाटू शकतं. पण, त्यावर हसण्याआधी जरा संतोषच्या आधीच्या कारकिर्दीकडे बघणं गरजेचं आहे. 

‘झेंडा‘ च्या वेळेस ‘संत्या‘ च्या भूमिकेच्या  मुळातच खूप जवळ असलेला संतोष, केवळ अजून त्यात शिरता यावं म्हणून संपूर्ण चित्रिकरणा दरम्यान त्या चाळीतच राहिला होता. ‘मोरया‘ च्या वेळेस देखील तसंच. ‘एकतारा‘ हा चित्रपट गायकाच्या आयुष्यावर आधारित. त्या भूमिकेसाठी संतोष साधारणपणे वर्षभर गायन आणि गिटार वाजवणे शिकत होता. त्या वर्षातल्या माझ्या जवळपास सर्व कार्यक्रमांना केवळ ऑब्जर्व करण्यासाठी तो माझ्याबरोबर फिरत होता. हे माझ्या सोबतच्या चित्रपटांचे झाले. परंतु, इतर दिग्दर्शकांबरोबर इतर चित्रपटांसाठी देखील काम करताना, भूमिकेसाठी तितकाच वेडेपणा त्याने केलेला मी फार जवळून बघितलेला आहे. आता हीच जर त्याची ‘मेथड‘ असेल तर ती आपण सर्वांनी एक्सेप्ट करायलाच हवी.. कारण ‘रिझल्ट‘ आपण बघितलेला आहे आणि तो निर्विवाद आहे!

अभिनयाच्या ह्याच वेडापाई संतोष आजही एकटा राहतो. अर्थात, एकटा राहत असून सुद्धा त्याच्या एकट्याचा संसार हा दृष्ट लागण्यासारखा आहे! त्याचं घर कधीही जाऊन बघा.. एखाद्या गृहिणीला लाजवेल असं टापटीप असतं! त्यातच, तो जवळ रहाणाऱ्या स्वतःच्या आई-वडिलांची, अधिक पुतणीची काळजी देखील घेतो. कुठल्याही मराठी अभिनेत्याच्या नशिबी असलेली दुर्दैवी काटकसर त्याच्याही नशिबी आहे. परंतु, आजवर संतोषने कुणाचे पैसे बुडवल्याची किंवा नको ती देणी करून ठेवल्याची तक्रार आजवर कधीही ऐकलेली नाही. 

अशा सोन्यासारख्या माणसाने आणि हाडाच्या अभिनेत्याने एखाद्या चित्रपटानंतर थोडे जास्त श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याची खिल्ली उडवली गेली. पण सहाराच्या वाळवंटामध्ये भर उन्हात पळत राहावे आणि सतत पाणी म्हणून जे भासते, त्याच्या जवळ गेल्यावर ते मृगजळ निघावे.. असा प्रवास केलेल्या माणसाला खरोखर जर एखादा चवदार पाण्याचा तलाव मिळाला तर.. त्याचे वेड्यासारखे नाचणे हे हास्यास्पद म्हणावे की केविलवाणे? 

ही शोकांतिका केवळ संतोष जुवेकरचीच नव्हे तर मराठीतल्या अनेक कलावंतांची आहे. वर्ष भर मेहनत करून एका शुक्रवारी चित्रपट येतो आणि शनिवारी एखादा मित्र किंवा फॅन त्याला विचारतो की "बाकी..  नवीन काय करतोयस?" त्यावेळेसचे त्या कलाकाराचे दुःख मीम करणाऱ्याला कधीच कळणार नाही. कारण दगडावर उमलू पाहणाऱ्या फुलाचा संघर्ष कबरी वरच्या बुरशीला कसा कळणार?
त्यातून, ज्या काही लोकांनी पहिली मीम केली त्यांचं खरोखरीच कौतुक आहे कारण त्यांनी प्रवाहच्याविरुद्ध, अर्थात सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाच्या अभिनेत्याविरुद्ध विधान करण्याचे धाडस दाखवले. संतोषने देखील त्याबाबत कुठेही तक्रार न नोंदवता खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन केले. पण त्यानंतर वडाच्या झाडावर उगवलेल्या बाकीच्या पिंपळाच्या वेलींनी आता थांबायला हवं. 

छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत एका अमराठी अभिनेत्याचा खुल्या दिलानं स्विकार करून तुम्ही तुमचं मोठं मन दाखवून दिलं आहे. आता आजूबाजूच्या मराठी अभिनेत्यांचे कौतुक करण्याची वेळ आली आहे. तिथे कमी पडून कमावलेलं घालवू नका. 
कुटुंबातील सोहळा आहे. एखादा कुटुंबीय विचित्र नाचला. त्याला चिडवून झालं! आता पुरे! आता त्याला जवळ घ्या. एवढंच!
आपला,
अवधूत गुप्ते

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : सोनू सूदच्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर अपघात; कारची ट्रकला धडक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
Mohammed Siraj: टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल

व्हिडीओ

Suniel Shetty Majha Maha Katta : मराठी सक्ती ते फिटनेस फंडा; सुनील शेट्टीचा माझा महा कट्टा
Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
Mohammed Siraj: टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
Video: बाबा म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान होणार अन् आता आमनेसामने येताच देवाभाऊंनी काय केलं? बाजूला बसलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा ताडकन् उठले!
Video: बाबा म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान होणार अन् आता आमनेसामने येताच देवाभाऊंनी काय केलं? बाजूला बसलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा ताडकन् उठले!
Shiv Sena UBT on Jain Muni: जैन मुनींची उद्धव-राज यांच्यावर विखारी टीका, आता ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; म्हणाले, मुनी असाल तर...
जैन मुनींची उद्धव-राज यांच्यावर विखारी टीका, आता ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; म्हणाले, मुनी असाल तर...
Goa Fire News: स्फोट अन् सर्वत्र मृतदेहांचा खच, फायर ब्रिगेड आत जाताच दिसलं भयंकर दृश, गोव्यातील नाईट क्लबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव... पर्यटक, कर्मचाऱ्यांसह 25 जणांचा मृत्यू
स्फोट अन् सर्वत्र मृतदेहांचा खच, फायर ब्रिगेड आत जाताच दिसलं भयंकर दृश, गोव्यातील नाईट क्लबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव... पर्यटक, कर्मचाऱ्यांसह 25 जणांचा मृत्यू
Virat Kohli : 2-3 वर्षांत असा खेळलोच नव्हतो..., स्वतःला पुन्हा सिद्ध करत विराट कोहलीने टीकाकारांना दिलं उत्तर, जिंकला प्लेयर ऑफ द सिरीज
2-3 वर्षांत असा खेळलोच नव्हतो..., स्वतःला पुन्हा सिद्ध करत विराट कोहलीने टीकाकारांना दिलं उत्तर, जिंकला प्लेयर ऑफ द सिरीज
Embed widget