Chhaava Box Office Collection Day 40: वाढता वाढता वाढे 'छावा'ची कमाई; 40व्या दिवशीही बॉक्स ऑफिस ठेवलं ताब्यात, आतापर्यंत किती कोटींचा गल्ला?
Chhaava Box Office Collection: विक्की कौशलचा 'छावा' चित्रपट प्रदर्शित होऊन 40 दिवस झाले. दरम्यान, या चित्रपटानं मोठी कमाई केली आहे. सहाव्या मंगळवारीही 'छावा'नं कोट्यवधींची कमाई केली आहे.

Chhaava Box Office Collection Day 40: विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटानं इतिहास रचला आहे. हा चित्रपट केवळ वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला नाही, तर त्यानं अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, 'छावा' (Chhaava) थिएटरमध्ये रिलीज होऊन 40 दिवस पूर्ण झाल्यानंतरही त्याची कमाई कमी होत नाहीये आणि महत्त्वाची बाब म्हणजे, अजूनही 'छावा' कोट्यवधींमध्ये कमाई करत आहे. 'छवा'नं रिलीजच्या 40 व्या दिवशी म्हणजेच, सहाव्या मंगळवारी किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...
'छावा'नं 40 व्या दिवशी किती कमाई केली?
'छावा' 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसचा राजा राहिला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित असलेल्या 'छावा'ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं, त्यामुळे 130 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटानं मोठा नफा कमावला आहे.
'छावा' प्रदर्शित होऊन जवळजवळ दीड महिना झाला, पण तरीही त्यानं बॉक्स ऑफिसवर आपलं स्थान मजबूत ठेवलं आहे. दरम्यानच्या काळात अनेक नवे चित्रपट आले आणि गेले पण त्यापैकी एकही 'छावा'चं सिंहासनाला धक्का देऊ शकला नाही. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन सहा आठवडे उलटले आहेत आणि तो अजूनही कोट्यवधींची कमाई करत आहे. जर आपण चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कलेक्शनबद्दल बोललो तर,
- 'छावा'नं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपये कमावले होते.
- दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाचा कलेक्शन 180.25 कोटी रुपये होतं.
- तिसऱ्या आठवड्यात 'छावा'नं 84.05 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
- या चित्रपटानं चौथ्या आठवड्यात 55.95 कोटी रुपये कमावले.
- तर पाचव्या आठवड्यात 'छावा'चं कलेक्शन 33.35 कोटी रुपये होतं.
- चित्रपटानं 36 व्या दिवशी 2.1 कोटी रुपये आणि 37 व्या दिवशी 3.65 कोटी रुपये कमावले.
- 'छावा'नं 38 व्या दिवशी 4.65 कोटी रुपये आणि 39 व्या दिवशी 1.85 कोटी रुपये कमावले.
- आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 40 व्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं रिलीजच्या 40 व्या दिवशी 1.50 कोटी रुपये कमावले आहेत.
- यासह, 'छावा'ची 40 दिवसांत एकूण कमाई आता 586.35 कोटी रुपये झाली आहे.
View this post on Instagram
'छावा' आता 'स्त्री 2'पेक्षा किती कोटींनी मागे?
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 'अॅनिमल' (553.87 कोटी), 'पठाण' (543.09 कोटी), 'गदर 2' (525.7 कोटी) आणि 'बाहुबली' (421 कोटी) या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. तथापि, हा चित्रपट 'स्त्री 2' (597.99 कोटी) ला मागे टाकू शकला नाही. 'छावा'ला 'स्त्री 2' चा विक्रम मोडण्यासाठी आणखी 12 कोटी रुपयांची गरज आहे. आता सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. 'सिकंदर'बद्दल बरीच चर्चा सुरू आहे, त्यामुळे 'छावा'ला कमाई करण्यासाठी आणखी 4 दिवस शिल्लक आहेत. यानंतर, 'सिकंदर'चं आगमन 'छावा'चा खेळ बिघडवू शकतं. या 'सिकंदर'शी स्पर्धा केल्यानंतर 'छावा' स्त्री 2 चा मुकुट जिंकू शकेल की नाही? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
