एक्स्प्लोर
टाटांच्या 6 रुपयांच्या स्टॉकमुळं 1 लाखांचे 9 कोटी बनले, तब्बल 87365 टक्के तेजी, 'हा' शेअर नेमका कोणता?
Stock Market : भारतीय शेअर बाजारात तेजी आणि घसरण पाहायला मिळते. काही कंपन्यांच्या स्टॉक्सनं गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.

ट्रेंट
1/6

टाटा ग्रुपच्या ट्रेंटच्या शेअरमध्ये मंगळवारी (25 मार्च) जोरदार तेजी पाहायला मिळाली. या कंपनीच्या स्टॉकमध्ये 4 टक्के वाढ झाली. हा शेअर आज इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 5247.95 रुपयांवर पोहोचला. यामुळं ट्रेडिंगचं वॉल्यूम देखील वाढलं.
2/6

टाटा ग्रुपच्या ट्रेंट या स्टॉकमध्ये गेल्या सहा महिन्यात मोठी घसरण झाली. या वर्षात 26 टक्क्यांची घसरण झाली. सोमवारी बाजार बंद झाला तेव्हा हा स्टॉक 5063 रुपयांवर होता.आज ट्रेंटचा स्टॉक 5247.95 रुपयांवर पोहोचला.
3/6

ट्रेंटचा स्टॉक गेल्या वर्षभरात 35 टक्क्यांनी वाढला आहे. ट्रेंटचा स्टॉक बाजारात आला तेव्हा 10 ऑगस्ट 2006 ला 6 रुपयांवर होता. त्यावेळी ज्यांनी 1 लाख रुपये गुंतवले असतील त्यांच्या गुंतवणुकीचं मूल्य 9 कोटी रुपयांवर पोहोचलं असेल.
4/6

डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत ट्रेंट या कंपनीचा नफा 496.5 कोटी झाला.
5/6

दरम्यान, भारतीय शेअर बाजारात आज (25 मार्च) तेजी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स अन् निफ्टी काही अंकांच्या तेजीसह बंद झाले. मात्र, गुंतवणूकदारांना साडे तीन कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 25 Mar 2025 09:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
