Chhaava Box Office Collection Day 40: 'छावा'ची गर्जना, बॉक्स ऑफिसवर नादखुळा परफॉर्मन्स; दिग्गजांना गुडघे टेकायला भाग पाडलं, कुणाकुणाला पछाडलं?
Chhaava Box Office Collection Day 40: विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटानं जबरदस्त कलेक्शन केलंय. चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन 40 दिवस झाले आहेत.

Chhaava Box Office Collection Day 40: 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटातून विक्की कौशलनं (Vicky Kaushal) चाहत्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं आहे. 'छावा'नं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) विक्रमी कमाई केली आहे. अजूनही 'छावा'ची घौडदौड बॉक्स ऑफिसवर सुरूच आहे. 'छावा' हळूहळू नवे विक्रम मोडण्याकडे वाटचाल करत आहे. चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबाबत बोलायचं झालं तर, सध्या 585 कोटी रुपये आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. तथापि, ते अजूनही स्त्री 2 च्या मागे आहे. स्त्री 2 ला मागे टाकण्यासाठी छावाला 12 कोटी रुपयांचा संग्रह आवश्यक आहे.
सहाव्या मंगळवारी 'छावा'चं कलेक्शन किती?
सॅक्निल्कच्या अहवालानुसार, 40 व्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चित्रपटाने 0.47 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हे आकडे संपूर्ण दिवसाचे नसून बदलू शकतात. आतापर्यंतच्या 'छावा'च्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत बोलायचं झालं तर, 'छावा'नं 585.57 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'छावा'नं कोणत्या चित्रपटांना पछाडलं?
'छावा'नं मोठ्या स्टार्सना हरवलंय. सर्व दिग्गजांसमोर 'छावा' पुरून उरलाय. 'छावा'नं शाहरुख खानचा 'पठाण' (543.09 कोटी), रणबीर कपूरचा 'अॅनिमल' (553.87 कोटी), 'गदर 2' (525.7 कोटी) आणि आमिर खानचा 'पीके' (340.80 कोटी) या चित्रपटांना मागे टाकले आहे.
View this post on Instagram
विक्की कौशलचं लाईफटाईम कलेक्शन किती?
'छावा'मध्ये विक्की कौशल मुख्य भूमिकेत झळकला आहे. तर, रश्मिका मंदानानं महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. तसेच, मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्नानं साकारली आहे. 'छावा'नं 31 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती. पहिल्या आठवड्यातच या चित्रपटानं 200 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला. 'छावा'नं 219. 25 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 180.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 84.05 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने चौथ्या आठवड्यात 55.95 कोटी रुपये कमावले. पाचव्या आठवड्यात या चित्रपटानं 33.35 कोटी रुपये कमावले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























