Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Astrology 16 November 2024 : देव दिवाळी काही राशींसाठी विशेष ठरणार आहे. या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत, जे 3 राशींचं नशीब पालटू शकतात.
Dev Diwali 2024 Lucky Zodiacs : ज्योतिषशास्त्रानुसार, देव दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच 15 नोव्हेंबरपासून अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. 15 नोव्हेंबरला शनि सरळ चालीत मार्गी होईल. 16 नोव्हेंबरला सूर्याचं राशी परिवर्तन होईल. याच दिवशी गजकेसरी योगाची निर्मिती देखील होत आहे, ज्यामुळे 3 राशींचं नशीब उजळेल. त्यामुळे यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी सर्वांगी शुभ आणि भाग्याची ठरणार आहे. त्यामुळे ग्रहाच्या संक्रमणामुळे 16 नोव्हेंबरपासून कोणत्या राशी (Zodiac Signs) सुखात जीवन जगणार? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
या राशीच्या चढत्या घरात गजकेसरी योग तयार होत आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळू शकतं. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. वाहन आणि मालमत्ता खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. यासोबतच तुमची मेहनत पाहून तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळू शकतं. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही नफा मिळेल. भागीदारीत चालवलेल्या व्यवसायातही तुम्हाला नफा मिळू शकतो. तुम्हाला लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो. यासोबतच आरोग्यही चांगलं राहणार आहे.
कर्क रास (Cancer)
या राशीमध्ये अकराव्या भावात गजकेसरी योग तयार होत आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही अमाप संपत्ती मिळू शकते. गुरूच्या कृपेने तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. नोकरीच्या क्षेत्रातही तुम्हाला बढती मिळू शकते. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. याद्वारे तुम्ही नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकता. तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झाल्या, या काळात तुम्हाला खूप पैसे मिळू शकतात. आपण बचत करण्यात देखील यशस्वी होऊ शकता. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.
वृश्चिक रास (Scorpio)
या राशीच्या लोकांसाठीही गजकेसरी योग काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेली समस्या संपुष्टात येऊ शकते. तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही बरेच फायदे मिळू शकतात. गजकेसरी योग तयार झाल्यामुळे या राशीचे लोक नोकरीत उच्च पदावर पोहोचतील. यासोबतच व्यवसायाच्या क्षेत्रातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण मिळण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :