GT vs PBKS IPL 2025 : गुजरातच्या बालेकिल्ल्यात पंजाब किंग्जचा बोलबाला! रोमांचक सामन्यात श्रेयस अय्यरच्या संघाचा 11धावांनी विजय
GT vs PBKS Match Updates IPL 2025 : आयपीएल 2025 चा पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.
LIVE

Background
गुजरातच्या बालेकिल्ल्यात पंजाब किंग्जचा बोलबाला!
आयपीएल 2025च्या पाचव्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा 11 धावांनी पराभव केला. एकेकाळी असे वाटत होते की गुजरातचा संघ 244 धावांचे लक्ष्य सहज गाठेल, पण शेवटी पंजाब किंग्जने हा सामना जिंकला, ज्यामध्ये विजयकुमार वैशकने मोलाचा वाटा उचलला. विजयकुमार वैशकने 15व्या आणि 17व्या षटकात प्रत्येकी पाच धावा दिल्या आणि आवश्यक धावगती 13 वरून 17 पर्यंत नेली. पंजाब किंग्जने प्रथम खेळल्यानंतर 243 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाला फक्त 232 धावा करता आल्या. गुजरातकडून साई सुदर्शनने 74, जोस बटलरने 54 आणि शर्फान रुदरफोर्डने 46 धावा केल्या.
अखेर पंजाबला मिळाली दुसरी विकेट; सुदर्शन आऊट
अर्शदीप सिंगने साई सुदर्शनला आऊट करून गुजरातला दुसरा धक्का दिला आहे. त्याने तो 41 चेंडूत 74 धावा करून बाद झाला. 13 षटकांनंतर धावसंख्या 152/2 आहे.
साई सुदर्शनने ठोकले अर्धशतक
साई सुदर्शनने 31 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात ग्लेन मॅक्सवेलने गुजरातला पहिला धक्का! कर्णधार शुभमन गिल आऊट
गुजरातला पहिला धक्का ग्लेन मॅक्सवेलने दिला. त्याने पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात कर्णधार शुभमन गिलला आऊट केले. तो 14 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. सहा षटकांनंतर धावसंख्या 61/1 आहे.
श्रेयस अय्यरचे हुकले पहिले IPL शतक, शशांक-प्रियांशसह गुजराती गोलंदाजांना धुतले
श्रेयस अय्यर आणि शशांक सिंग यांच्यातील 81* धावांच्या भागीदारीमुळे पंजाब किंग्जने गुजरात टायटन्ससमोर 244 धावांचे लक्ष्य ठेवले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात पंजाबने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत पाच गडी गमावून 243 धावा केल्या. आयपीएलमधील पंजाबची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. गेल्या हंगामात पंजाबने केकेआरविरुद्ध 262/2 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
