Watch Video: बाबर आझममुळं रन आऊट झाल्यानंतर इमाम-उल-हकचा संयम तुटला, भरमैदानातचं त्यानं...
PAK vs WI 2nd ODI: पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यात मुलतान (Multan) येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर (Multan Cricket Stadium) दुसरा एकदिवसीय सामना खेळण्यात आला.
PAK vs WI 2nd ODI: पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यात मुलतान (Multan) येथील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर (Multan Cricket Stadium) दुसरा एकदिवसीय सामना खेळण्यात आला. पाकिस्तानच्या संघानं हा सामना 120 धावांनी जिंकला. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक बाद झाल्यानंतर (Imam-ul-Haq) त्यानं भरमैदानात संताप व्यक्त केला. त्याचा राग कर्णधार बाबर आझमसाठी (Babar Azam) होता. दरम्यान, इमामनं मिडविकेटच्या दिशेनं एक शॉट खेळला होता. ज्यावर एक धाव सहज पूर्ण केली जाऊ शकत होती. इमाम धावला पण बाबर आझम आपल्या जागेवरून हलला नाही. त्यामुळे इमामला रन आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.
नेमकं काय घडलं?
पाकिस्तानच्या डावातील 28 व्या षटकात बाबर आझमच्या चुकीमुळं इमामला आपली विकेट गमवावी लागली. इमाम आणि बाबर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 120 धावांची भागीदारी केली. 72 चेंडूत 72 धावा केल्यानंतर इमाम जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. तो लवकरच आपले शतक पूर्ण करेल, असं वाटत होतं. मात्र, तो रन आऊट झाल्यानंतर स्टेडियममध्ये शांतता पसरली.
पाकिस्तानचा वेस्ट इंडीजवर विजय
या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्ताननं 50 षटकात 8 विकेट्स गमावून वेस्ट इंडीजसमोर 275 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनं लक्ष्याचा पाठलाग करताना 10 षटकांत 1 गडी गमावून 71 धावा केल्या होत्या. पण काइल मेयर्स बाद झाल्यानंतर विकेट्सची रांग लागली. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या 155 धावांवर गारद झाला. ज्यामुळं पाकिस्तानच्या संघानं हा सामना 120 धावांनी जिंकला. पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, मोहम्मद वसीमनं तीन विकेट्स मिळवल्या.
व्हिडिओ-
- Indonesia Masters 2022: इंडोनेशिया ओपनमध्ये भारताचं आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत पराभूत
- आयपीएलनंतर आता आर. अश्विन खेळू शकतो या लीगमध्ये, भारतीय संघालाही होईल यामुळे फायदा
- Ranji Trophy: क्रीडा मंत्र्याची शतकी खेळी, पश्चिम बंगाल उपांत्य फेरीत