एक्स्प्लोर
Asia Cup : महिला आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील लढती ठरल्या, भारताविरुद्ध कुणाचं आव्हानं, विजेतेपदापासून दोन पावलं दूर
Womens Asia Cup : महिला आशिया चषकाच्या उपांत्य फेरीतील संघ निश्चित झाले आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

आशिया कप
1/5

भारतानं महिला आशिया कपच्या ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अ गटातून भारत पहिल्या स्थानावर राहिला.
2/5

ब गटातून श्रीलंकेनं पहिल्या स्थानावर राहत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
3/5

ब गटात बांगलादेश दुसऱ्या स्थानावर होतं. उपांत्य फेरीत बांगलादेश विरुद्ध भारताचा सामना होणार आहे. ही मॅच 26 जुलै रोजी दुपारी दोन वाजता सुरु होईल. भारताची मदार हरमप्रीत कौर, स्मृती मानधना, शफाली वर्मा यांच्यावर असेल.
4/5

पाकिस्तान अ गटात दुसऱ्या स्थानावर होतं. भारतानं नेपाळला पराभूत केल्यानं पाकिस्तानचा मार्ग सुकर झाला. उपांत्य फेरीत त्यांची लढत श्रीलंकेविरुद्ध होईल. ही मॅच 26 जुलै रोजी होईल.
5/5

आशिया कप स्पर्धेत भारत, श्रीलंका,नेपाळ, पाकिस्तान, मलेशिया, थायलँड, बांगलादेश, यूएई हे संघ सहभागी झाले होते. यापैकी भारत, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान हे उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. अंतिम फेरीची लढत 28 जुलै रोजी होणार आहे.
Published at : 25 Jul 2024 12:11 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion