एक्स्प्लोर
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीतील 27 वर्षांचा विक्रम इंग्लंडने मोडला; कोणत्या संघाने केलीय सर्वोच्च धावसंख्या?, पाहा यादी
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु झाली असून 9 मार्च रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.

Champions Trophy 2025
1/7

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये धावांचा पाऊस पडत आहे. या स्पर्धेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 351 धावा केल्या. यामध्ये इंग्लंडचा खेळाडू बेन डकेटने 165 धावांची ऐतिहासिक खेळी खेळली.
2/7

23 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात, इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 27 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा संघ बनला. इंग्लंडने 351 धावा केल्या आहेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एखाद्या संघाने 350 धावांचा टप्पा गाठण्याची ही पहिलीच वेळ आहे.
3/7

यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता, न्यूझीलंडने 2004 मध्ये अमेरिकेविरुद्ध 347 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात, न्यूझीलंडच्या नॅथन अॅशलेने 145 धावांची खेळी खेळली.
4/7

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्याने भारताविरुद्ध 338 धावा केल्या.
5/7

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या 331 धावा आहे. भारताने 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही धावसंख्या केली होती. या यादीत भारत चौथ्या स्थानावर आहे.
6/7

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु झाली असून 9 मार्च रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
7/7

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील हायव्होलटेज सामना म्हणजेच भारत आणि पाकिस्तानचा सामना आज (23 फ्रेब्रुवारी) रंगणार आहे.
Published at : 23 Feb 2025 09:43 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
