लाडकी बहीणचे पैसे मिळणार की नाहीत? मंत्री दत्तामामा भरणेंनी सांगून टाकलं!
Dattatreya Bharane : लाडकी बहिणी योजना (Ladki Bahini Yojana) ही राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. लाडकी बहिण योदनेबाबत राज्याचे क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

Dattatreya Bharane : लाडकी बहिणी योजना (Ladki Bahini Yojana) ही राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, निवडणुकीच्या काळात महिलांना 2100 रुपये देणार असल्याचे महायुतीनं सांगितले होते. अद्याप महिलांना 2100 रुपये मिळाले नाहीत. यावरुन सध्या विरोधका आक्रमक होताना दिसत आहे. दरम्यान, लाडकी बहिण योदनेबाबत राज्याचे क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. या योजनेमुळं तिजोरीवर बोजा होत असला तरीही शेतकरी कर्जमाफी किंवा लाडकी बहीण योजना यातील कोणतीही योजना बंद होणार नाही असा खुलासा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला.
लाडक्या बहिणी योजनेमुळे सध्या तिजोरीवर बोजा पडत असला तरी शेतकरी कर्जमाफी, शेतकरी पिक विमा अथवा लाडकी बहीण यातील कोणतीही योजना बंद केली जाणार नाही असे दत्तात्रय भरणे म्हणाले. याबाबत होत असलेली टीका योग्य नसल्याचे भरणे यांनी सांगितले. आज पंढरपूर मध्ये पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार नाही
शेतकरी कर्जमाफी बद्दल अजित दादांनी भूमिका मांडली आहे ती सरकारची भूमिका आहे. आजची परिस्थिती अवघड आहे मात्र पुढे काय होईल हे सांगता येत नाही. शेतकरी आणि लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. एक रुपयात पीक विमा योजना बंद होण्याचे चर्चा सुरू आहे. मात्र असे काही होणार नाही. लाडक्या बहिणींनाही 2100 रुपये दिले जाणार असून ती ही योजना बंद होणार नाही. सध्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवर थोडा ताण असल्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना पुढे ढकलली असली तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असा पुनरुच्चार भरणे यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहिण योजना बंद होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर भरणे यांनी प्रतिक्रिया दिली.
तणाव निर्माण होईल असे वक्तव्य कुणीही करु नये
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत बोलताना राज्यात समाजामध्ये तणाव निर्माण होईल असे वक्तव्य कुणीही करू नये. समाजा समाजामध्ये वाद हे योग्य नाहीत. प्रत्येक नेत्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे असा सल्लाही भरणे यांनी दोन्ही बाजूंच्या नेत्यांना दिला.
महत्वाच्या बातम्या:
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मिळणारी मदत रखडली? कार्यालयात माराव्या लागतायत फेऱ्या























