Jaykumar Gore: माझं राजकारण संपलं तरी चालेल पण मी पवारांच्या पुढे झुकणार नाही; मंत्री जयकुमार गोरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल
सगळ्या नेत्यांनी शरद पवारांसोबत तडजोड केली असेल, मात्र पश्चिम महाराष्ट्रतला एकमेव फकड्या आहे जो पवारांपुढे झुकला नाही, असा खरमरीत टोला ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लागावला आहे.

सातारा : माण खटावच्या लोकांनी बारामतीच्या पवारांवर प्रचंड प्रेम केलं. मात्र याच बारामतीच्या लोकांना सगळ्यात पहिली कळ लागली. त्यांना वाईट वाटायला लागलं की सामान्य कुटुंबातील पोरगा आमदार झाला. सामान्य कुटुंबातला रेशनिंग दुकानदाराचा मुलगा आमदार झाला, याचं पवारांना वाईट वाटतंय. मी मंत्री झाल्याचं तर त्यांना मान्यच नाहीये. सगळ्या नेत्यांनी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) तडजोड केली असेल, मात्र पश्चिम महाराष्ट्रतला एकमेव फकड्या आहे जो पवारांपुढे झुकला नाही, असा खरमरीत टोला ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे (Minister Jayakumar Gore) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवारांना लगावला आहे. माण तालुक्यातील आंधळी येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
माझा विरोध बारामतीला आणि पवारांना अजिबात नाही, पण..
मी बारामतीच्या पुढे झुकलो असतो तर माझी आमदारकी सोपी झाली असती. मात्र यामुळे आपल्या शेतात पाणी आलं नसतं, मी त्यांची गुलामगिरी स्वीकारली असती तर माण खटावला पाणी मिळालं नसतं. माझा विरोध बारामतीला आणि पवारांना अजिबात नाही. मात्र ज्यांनी या तालुक्याला मातीला पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांना माझा विरोधात आहे. असं सुद्धा मंत्री जयकुमार गोरे म्हणाले.
अख्खा जिल्हा, अख्खं राज्य जयकुमार गोरेला अडवायला रोज नदीकिनारी जाऊन पूजा घालत आहे, काळ्या बाहुल्या रोवतंय. साध्या घरातलं पोरगं, आमदार तीनवेळा झालं. एक निवडणूक अशी झाली नाही, माझ्यावर केस झाली नाही. पण कधीही मी थांबलो नाही. कितीही आडवं या, कितीही दाबायचा प्रयत्न करा, कितीही बाहुल्या बांधा. पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या मागे जनता आहे, तोपर्यंत तुम्ही जयकुमार गोरेचं कधी वाकडं करु शकत नाही. कोणाचं वाईट केलं नाही, तर कधीच वाईट होत नाही. जो वाईट करतो, त्याचं चांगलं होत नाही. मी कोणाच्या नादाला लागत नाही. माझ्या नादाला कोणी लागायचं नाही. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत नाही. आता सावज टप्प्यात आलंय, थोडी वाट बघा. आज जास्त बोलणार नाही. असा इशारा या पूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला होता. अशातच आता पुन्हा एकदा त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
वडूजच्या ‘नगराध्यक्ष’ पदी रेशमा बनसोडे बिनविरोध!
साताऱ्याच्या वडूज नगरपंचायतच्या मावळत्या नगराध्यक्षा मनिषा काळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदावर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या रेश्मा श्रीकांत बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
हे ही वाचा























