एक्स्प्लोर

MS Dhoni : धोनी चेन्नईसाठी आता पनवती झालाय, पहिल्यांदा त्याला काढून टाका, दोन पराभवानंतर कोणी केली बोचरी टीका? युवराज सिंगच्या वडिलांची सुद्धा करून दिली आठवण!

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात जेव्हा तो क्रीजवर पोहोचला तेव्हा चेन्नईला 12 चेंडूत 39 धावा आणि शेवटच्या षटकात 20 धावा हव्या होत्या, पण माहीची जादू चालली नाही.

MS Dhoni : एकेकाळी जगातील सर्वोत्तम फिनिशर असलेला महेंद्रसिंह धोनी रविवारी आपल्या संघाला आयपीएल 2025 मध्ये विजयापर्यंत नेऊ शकला नाही. शेवटच्या सामन्यात नवव्या क्रमांकावर आल्यानंतर, 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात जेव्हा तो क्रीजवर पोहोचला तेव्हा चेन्नईला 12 चेंडूत 39 धावा आणि शेवटच्या षटकात 20 धावा हव्या होत्या, पण माहीची जादू चालली नाही. सीएसके टार्गेटपासून सहा धावा दूर राहिला. धोनीने 11 चेंडूत 16 धावा केल्या. पण वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिल्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर स्पष्ट दिसत होता. त्याने 19व्या षटकात तुषार देशपांडेला एक चौकार आणि एक षटकार ठोकला, पण संदीप शर्माच्या गोलंदाजीवर शेवटच्या षटकात विकेट गमावली.

संदीप शर्माने 20व्या षटकाची सुरुवात वाईडने केली. विजयासाठी शेवटच्या षटकात 20 धावा वाचवायला हव्या होत्या. धोनी स्ट्राइकवर होता. संदीपने पहिल्या दबावात वाईड टाकला. संदीपने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो डेथ ओव्हर्सचा मास्टर बॉलर आहे. पुढच्याच चेंडूवर माहीची विकेट घेतली. शिमरॉन हेटमायरने सीमारेषेजवळ डायव्हिंग करून झेल घेतला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर धोनीच्या फलंदाजी आणि फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

धोनी आता ओव्हररेटेड असून चेन्नईसाठी पनवती

बाॅलिवूड गायक सोनू निगमने धोनीच्या कामगिरीवरून बोचरी टीका केली आहे. धोनी आता ओव्हररेटेड असून चेन्नईसाठी पनवती झाल्याची टीका केली आहे. त्याला संघातून हटवण्याची मागणी केली आहे. सोनू निगमने युवराज सिंगच्या वडिलांनी केलेल्या आरोपांची सुद्धा आठवण करून दिली आहे. योगराज सिंग यांनी धोनीवर गंभीर आरोप केले होते. दुसरीकडे, भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागनेही धोनीच्या फिनिशिंग क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

अलिकडील काळात धोनीने संघाला कधी सामने जिंकून दिले हे आठवत नाही

अलिकडील काळात धोनीने संघाला कधी सामने जिंकून दिले हे आठवत नाही, असे सेहवागचे म्हणणे आहे. त्याने क्रिकबझला सांगितले की, "20 मध्ये 40 धावा करणे हे अवघड काम आहे. खेळाडू कितीही मोठा असला तरी ते अवघड काम आहे. तुम्ही एक किंवा दोन प्रसंगी जिंकता, एवढेच. मला आठवते की धोनीने अक्षर पटेलच्या चेंडूवर 24 किंवा 25 धावा केल्या होत्या आणि एकदा धरमशालामध्ये त्याने इरफान पठाणच्या चेंडूवर 19 किंवा 20 धावा केल्या होत्या." तो पुढे म्हणाला, "तुम्हाला फक्त एक किंवा दोन सामने आठवत आहेत. तुम्हाला अलीकडचा एकही सामना आठवत नाही. गेल्या पाच वर्षांपासून CSK 180 पेक्षा जास्त धावा करू शकलेली नाही."

रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईचा संघ सामना जिंकेल अशी आशा चाहत्यांना होती. शेवटच्या षटकात फक्त महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा क्रीजवर होते. संदीप शर्माने शेवटच्या षटकाने सामन्याचा मार्ग बदलला. शेवटच्या 6 चेंडूंवर विजयासाठी 20 धावांची गरज होती, पण धोनी बाद होताच आशांना मोठा धक्का बसला आणि अखेर संघाचा पराभव झाला.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Virat Kohli RCB Playing XI : गेल, राहुल, चहल IN, मोहम्मद सिराज OUT...; विराट कोहलीने निवडली RCB ची ऑलटाइम धडकी भरवणारी Playing XI
गेल, राहुल, चहल IN, सिराज OUT...; कोहलीने निवडली RCB ची ऑलटाइम धडकी भरवणारी Playing XI
Ban vs Pak 3rd ODI : पाकिस्तानाचा झिम्बाब्वे झालाय? लाज वाटू द्या...; बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज संतापला, नको नको ते बोलला
पाकिस्तानाचा झिम्बाब्वे झालाय? लाज वाटू द्या...; बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज संतापला, नको नको ते बोलला
Harshit Rana News : हातात काठी, लंगडत पोहोचला... हर्षित राणाच्या 15 सेकंदांच्या व्हिडीओने क्रिकेट विश्वात खळबळ; नेमकं काय घडलं?
हातात काठी, लंगडत पोहोचला... हर्षित राणाचा 15 सेकंदांचा व्हिडीओ पाहून सगळे हादरले; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget