700 गाड्यांच्या ताफ्यासोबत पवारांच्या राष्ट्रवादीत, 9 महिन्यांपासून फरार, जेलमध्ये समर्थकांकडून वाल्मिक कराडला मारहाण, कोण आहे बबन गिते?
Who Is Baban Gite Beed Jail War: शशिकांत पांडूरंग गिते उर्फ बबन गिते हे परळीच्या राजकारणातील मुंडे बंधू-भगिनींच्या नंतरचं नाव म्हणून घेतलं जातं.

Who Is Baban Gite Beed Jail War: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्येचा आणि खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि सुदर्शन घुलेला (Sudharshan Ghule) मारहाण झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. बीड जिल्हा कारागृहात आज (31 मार्च) सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास बबन गिते (Baban Gite) यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी यांच्यात मारामारी (Beed Jail War) झाली. यामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला देखील मारहाण करण्यात आली, असा दावा सुरेश धस यांनी केला आहे. मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत.
गेल्या नऊ महिन्यांपासून बबन गिते फरार आहे. बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गिते याच्यासह मुकुंद गिते, महादेव गिते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि खून प्रकरणातील आरोपी बबन गिते अद्याप समोर आलेला नाही.
आंधळे खून प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी-
आंधळे खून प्रकरणात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी तक्रारी दिल्या गेल्या होत्या. एकूण 11 जणांवर गुन्हा नोंद होता. यात वाल्मिक कराड विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. मात्र परळी पोलिसांनी तपासात वाल्मिक कराडचा सहभाग नसल्याचे सांगून त्याचे नाव आरोपीतून वगळले आहे. उर्वरित आरोपी अटक असून केवळ बबन गिते गेल्या नऊ महिन्यांपासून फरार आहे.
कोण आहे बबन गिते? (Who Is Baban Gite)
शशिकांत पांडूरंग गिते उर्फ बबन गिते हे परळीच्या राजकारणातील मुंडे बंधू-भगिनींच्या नंतरचं नाव म्हणून घेतलं जातं. बबन गिते जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. बबन गितेने जनक्रांती सेनेच्या माध्यमातून मोठं संघटन उभं केलं. बबन गिते यांनी परळी विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्याचा मोठा वाटा उचलला. गितेच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या आहेत. याआधी त्या परळी पंचायत समितीच्या सभापतीदेखील होत्या. बबन गितेला मानणारा मोठा वर्ग परळी तालुक्यात आहे.
700 पेक्षा अधिक वाहनांचा ताफ्यांसह बीडमध्ये शक्तीप्रदर्शन-
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बबन गितेने 17 ऑगस्ट 2023 मध्ये परळीत मोठं शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. जवळपास 700 पेक्षा अधिक वाहनांच्या ताफ्यासह बबन गिते हे सभा स्थळी आले होते. त्यावरून गिते यांच्यामागे परळीतील मोठी जनशक्ती असल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीच्या कुठल्याच मोठ्या नेत्याचं आतापर्यंत एवढ मोठं शक्तीप्रदर्शन झालं नव्हतं. शरद पवार यांनीही धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून गित्ते यांना बळ दिलं.
बबन गितेची बीडमध्ये ताकद किती?, VIDEO:
संबंधित बातमी:
बबन गिते गँगने बीड जेलमध्येच डाव साधला, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला धुतला, सुरेश धस यांचा दावा!

























