एक्स्प्लोर
शाळेच्या रस्त्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्याने चालत्या गाडीत शरद पवारांना दिलं निवेदन
माढा (Madha) तालुक्यातील टाकळी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला रस्ता नाही. त्यामुळं आज या शाळेच्या चिमकुल्या विद्यार्थ्यांनी चालत्या गाडीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना निवेदन दिले.
ZP School students
1/9

शाळेच्या चिमकुल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या रस्त्यासाठी थेट गनिमी कावा करत चालत्या गाडीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांना निवेदन दिले आहे.
2/9

शाळेला रस्ता मिळवण्यासाठी पोलिसांनी अडवल्यावर पळत गाडीपर्यंत जावून निवेदन देणारे चिमुरडे
3/9

माढा (Madha) तालुक्यातील टाकळी गावातील जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेला गेल्या अनेक वर्षापासून रस्ता नाही.
4/9

माढा तालुक्यातील टाकळी गावातील जिल्हा परिषद शाळेला गेल्या अनेक वर्षापासून रस्ता नाही. या प्राथमिक शाळेला जाणाऱ्या लहान मुलांना चिखलातून शाळेत जावे लागते.
5/9

पोलिसांनी या मुलांना भेट नाकारल्याने ही मुले निराश झाली. मात्र, त्यांनी रस्त्यासाठी आपली जिद्द सोडली नाही. कार्यक्रम संपवून पवारांच्या गाडीचा ताफा परत निघाल्यावर पोलिसांची नजर चुकवून यातील चौथीमध्ये शिकणाऱ्या अमित कळसाईत या मुलाने शरद पवार यांची गाडी गाठली
6/9

आम्हाला पोलिसांनी भेटू न दिल्यानं मी गनिमी कावा करुन पवार साहेबांना आमच्या शाळेच्या रस्त्याचे निवेदन दिल्याचे छोट्या अमितनं सांगितलं.
7/9

मुलगा गाडीमागे पळत असल्याचे पाहून अभिजित पाटील यांनी गाडी थांबवली आणि या चिमुकल्यांनी आपले निवेदन शरद पवार यांच्या हातात दिले
8/9

अभिजित पाटील यांनी शरद पवार यांच्या सूचनेनुसार या बाळगोपलांची भेट घेतली. साहेबांनी तुमच्या शाळेला रास्ता देण्याविषयी मला सांगितल्याचे या मुलांना सांगितले.
9/9

पोलिसांची नजर चुकवून यातील चौथीमध्ये शिकणाऱ्या अमित कळसाईत या मुलाने शरद पवार यांची गाडी गाठली.
Published at : 16 Nov 2023 11:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
विश्व
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion