Sunita Williams : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर 9 महिने 14 दिवसांनी पृथ्वीवर परतले. त्यांच्यासोबत क्रू-9 चे आणखी दोन अंतराळवीर होते अमेरिकेचे निक हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव अशी त्यांची नावे आहेत.

Sunita Williams : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर 9 महिने 14 दिवसांनी पृथ्वीवर परतले आणि अवघं जग त्यांच्या घरवापसीने भारावून गेलं. त्यांच्यासोबत क्रू-9 चे आणखी दोन अंतराळवीर होते अमेरिकेचे निक हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव अशी त्यांची नावे आहेत. आज 9 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 वाजता त्यांचे ड्रॅगन अंतराळयान फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर उतरले.
Splashdown confirmed! #Crew9 is now back on Earth in their @SpaceX Dragon spacecraft. pic.twitter.com/G5tVyqFbAu
— NASA (@NASA) March 18, 2025
परतीच्या प्रवासात 7 मिनिटे संपर्क तुटला
हे चार अंतराळवीर मंगळवारी (18 मार्च) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) निघाले होते. जेव्हा यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला तेव्हा त्याचे तापमान 1650 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. या कालावधीत सुमारे 7 मिनिटे दळणवळण ठप्प होते म्हणजेच वाहनाशी संपर्क झाला नाही.
Welcome home, @AstroHague, @Astro_Suni, Butch, and Aleks! 🌎✨
— NASA Astronauts (@NASA_Astronauts) March 19, 2025
Crew-9 splashed down safely in the water off the coast of Florida near Tallahassee on Tuesday, March 18, 2025.
Hague, Gorbunov, Williams, and Wilmore have returned to Earth from a long-duration science expedition… pic.twitter.com/nWdRqaSTTq
स्पेस स्टेशनवरून पृथ्वीवर परतण्यासाठी 17 तास लागले
ड्रॅगन कॅप्सूल वेगळे होण्यापासून ते समुद्रात उतरण्यासाठी सुमारे 17 तास लागले. 18 मार्च रोजी सकाळी 08:35 वाजता अंतराळयान बाहेर पडले, म्हणजेच दार बंद झाले. 10:35 वाजता अंतराळयान ISS पासून वेगळे झाले. 19 मार्च रोजी पहाटे 2:41 वाजता डीऑर्बिट बर्नला सुरुवात झाली. म्हणजेच अवकाशयानाचे इंजिन कक्षेतून विरुद्ध दिशेला उडवले गेले. यामुळे अंतराळयानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला आणि पहाटे 3:27 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील पाण्यात उतरले.
Splashdown of Dragon confirmed – welcome back to Earth, Nick, Suni, Butch, and Aleks! pic.twitter.com/M4RZ6UYsQ2
— SpaceX (@SpaceX) March 18, 2025
8 दिवसांच्या मिशनवर, पण 9 महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोइंग आणि नासाच्या 8 दिवसांच्या संयुक्त 'क्रू फ्लाइट टेस्ट मिशन'वर गेले. या मोहिमेचा उद्देश बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाच्या अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर ये जा करणाऱ्या क्षमतेची चाचणी करणे हा होता. अंतराळवीरांनाही अवकाश स्थानकावर 8 दिवसांत संशोधन आणि अनेक प्रयोग करावे लागले. परंतु थ्रस्टरच्या खराबीनंतर, त्यांचे 8 दिवसांचे मिशन 9 महिन्यांहून अधिक झाले.
अंतराळात सर्वाधिक काळ सतत राहण्याचा विक्रम
रशियन अंतराळवीर व्हॅलेरी पॉलीकोव्ह यांच्या नावावर अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम आहे, त्यांनी 8 जानेवारी 1994 ते 22 मार्च 1995 पर्यंत मीर स्पेस स्टेशनवर 437 दिवस घालवले. ISS वर सर्वाधिक काळ (371 दिवस) राहण्याचा विक्रम फ्रँक रुबियो यांच्या नावावर आहे.
अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम...(सर्व मोहिमांसह)
- पेगी व्हिटसन: 675 दिवस
- सुनीता विल्यम्स: 608 दिवस
- जेफ विल्यम्स: 534 दिवस
- मार्क वेंडे हेई: 523 दिवस
- स्कॉट केली: 520 दिवस























