एक्स्प्लोर
650 किलो शेवंती, 180 किलो भगवा झेंडू अन् 300 किलो अष्टराची फुलं; लक्ष्मीपूजनासाठी विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक सजावट
Laxmi P आज लक्ष्मीपूजन निमित्ताने विठ्ठल मंदिराला विविध रंगांच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

Tuljapur Temple Decoration
1/8

दिवाळी हा महाउत्सव विठ्ठल मंदिरात रोज वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे.
2/8

दिवाळीनिमित्त देशभरातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असताना आजच्या या आकर्षक फुलांच्या सजावटीमुळे विठ्ठल मंदिर सुवासिक वासाने घमघमून गेले आहे.
3/8

या सजावटीसाठी पांढरी शेवंती 650 किलो, भगवा झेंडु 180 किलो, पिवळा झेंडू 250 किलो, कण्हेर 35 किलो, अष्टर 300 किलो वापरण्यात आले.
4/8

हिरवा पाला 200 माळा, गुलाब १०० गड्डी, कमिनी ३०० गड्डी, शेवंती १०० गड्डी इत्यादी फुलांचा वापर करण्यात आला आहे.
5/8

सेवेकरी अर्जुन हनुमान पिंगळे, बीड यांनी सेवाभावी तत्वावर मोफत फुलांची आरास करून दिली आहे.
6/8

या फुलांच्या सजावटीसाठी श्री फ्लावर्स पुणे यांच्या सुमारे 25 कामगारांनी 8 तास परिश्रम घेतले आहेत.
7/8

विठ्ठल चौखांबी , सोळखंबी , रुक्मिणी मंदिर परिसर , महाद्वार , विठ्ठल सभा मंडप अशा मंदिरातील विविध भागांना ही फुलांची सजावट केलेली आहे.
8/8

या सजावटीमुळे संपूर्ण मंदिराचं रुपडं पालटून गेलं आहे.
Published at : 01 Nov 2024 09:18 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
