Katrina Kaif Visited Pakistan: कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल
Katrina Kaif Visited Pakistan: कतरिना कैफनं 'छावा' फेम अभिनेता विक्की कौशलसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. विक्की एकापेक्षा एक धमाकेदार प्रोजेक्ट्सवर काम करतोय.

Katrina Kaif Visited Pakistan: बॉलिवूडच्या (Bollywood Actress) टॉप अभिनेत्रींमध्ये सहभागी होणारी अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. काही जाहीराती सोडल्या तर कतरिना कुठेही दिसत नाही. कतरिना कैफनं 'छावा' (Chhaava) फेम अभिनेता विक्की कौशलसोबत (Vicky Kaushal) आपली लग्नगाठ बांधली आहे. विक्की एकापेक्षा एक धमाकेदार प्रोजेक्ट्सवर काम करतोय. मात्र, कतरिनाच्या प्रोजेक्टबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. पण, सध्या तिचा एक व्हायरल होणारा फोटो चर्चेचा विषय ठरतोय.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंवरुन समजलं की, कतरिना पाकिस्तानला जाऊन आलीय. तेव्हापासूनच कतरिना पाकिस्तानला का गेली? काय काम होतं? कोणाला भेटायला गेली? अशा चर्चा सुरू झाल्या. अशातच आता पाकिस्तानातील एका व्यक्तीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानं कतरिना पाकिस्तानला नेमकं कशासाठी गेलेली? याचा उलगडा केला आहे.
'तो' फोटो कुणासोबतचा?
कतरिनाच्या पाकिस्तान भेटीबाबतची व्हायरल होणारी पोस्ट पाकिस्तानातच राहणाऱ्या फॅशन डिझायनरची होती. पाकिस्तानचा फॅशन डिझायनर हसन शहरयार यासीननं एक व्हिडीओही व्हायरल केला आहे. त्यामध्ये त्यानं कतरिनाच्या पाकिस्तान भेटीचा खुलासा केला आहे.
फॅशन डिझायनर 'हसना मना है' नावाच्या एका पाकिस्तानी शोमध्ये गेला होता. त्यावेळी शो सुरू असतानाच स्क्रिनवर एक फोटो दाखवण्यात आला. त्यामध्ये डिझायनर आणि कतरिना एकत्र दिसत होते. त्यावेळी फॅशन डिझायनरनं कतरिनाच्या पाकिस्तान दौऱ्याचा खुलासा केला. त्यानं सांगितलं की, फारच कमी लोकांना माहीत आहे की, कतरिना कैफ पाकिस्तानला आली होती. ती लाहौरला आलेली. कतरिनाच्या टीमनं फॅशन डिझायनरला तसा फोनही केला होता आणि कतरिना खूप मोठी फॅन असल्याचं सांगितलं होतं.
पाकिस्तानी डिझायनरच्या स्टुडिओमध्ये जाऊन कतरिनानं त्याची भेट घेतली होती. त्यानंतरही बऱ्याचदा दोघांची भेट झाली होती. पाकिस्तानी फॅशन डिझायनरनं कतरिनासाठी एक स्पेशल पोस्टही लिहिली होती.

पाकिस्तान दौऱ्याचं नेमकं कारण काय?
फारच कमी लोकांना माहीत आहे की, कतरिना कैफ पाकिस्तानला जाऊन आली आहे. पण, पाकिस्तान भेटी मागचं कारण फक्त आणि फक्त डिझायनरची भेट घेणं होतं की, आणखीसुद्धा काही होतं? याबाबत मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















