एक्स्प्लोर

मोठी बातमी! मोदी सरकारनं बंद केली 'ही' योजना, तुमचे पैसे अडकलेत का? जाणून घ्या सविस्तर माहिती

केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजे 26 मार्च 2025 पासून सुवर्ण मुद्रीकरण योजना (GMS) बंद करण्याची घोषणा सरकारनं केली आहे.

Gold Monetization Scheme : केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजे 26 मार्च 2025 पासून सुवर्ण मुद्रीकरण योजना (GMS) बंद करण्याची घोषणा सरकारनं केली आहे. बाजारातील बदलत्या परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. बँका अजूनही 1 ते 3 वर्षांच्या कालावधीसह अल्प-मुदतीच्या सुवर्ण ठेव योजना चालवू शकतील असंही सरकारनं सांगितलं आहे.

सुवर्ण मुद्रीकरण योजना

सुवर्ण मुद्रीकरण योजना योजना ही 15 सप्टेंबर 2015 रोजी सुरू करण्यात आली होती. ज्याचा उद्देश देशातील घरांमध्ये आणि संस्थांमध्ये पडून असलेल्या सोन्याचा उत्पादक हेतूंसाठी वापर करणे आणि सोन्याच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हा होता. नोव्हेंबर 2024 पर्यंत या योजनेद्वारे आतापर्यंत सुमारे 31,164 किलो सोने जमा झाले आहे.

मध्यम आणि दिर्घ मुदतीच्या सुवर्ण ठेव योजना बंद

सरकारने मध्यम मुदतीच्या (5-7 वर्षे) आणि दीर्घ मुदतीच्या (12-15 वर्षे) सुवर्ण ठेव योजना बंद केल्या आहेत. परंतू बँका त्यांच्या स्तरावर अल्प मुदतीच्या (1 ते 3 वर्षे) ठेव योजना राबवू शकतात.

ठेवीदारांच्या सोन्याचे काय होणार?

जर तुम्ही या योजनेत सोने जमा केले असेल तर घाबरण्याची काही गरज नाही. जर तुमची ठेव पूर्ण झाली असेल तर तुम्ही ती सोने किंवा रोखीने काढू शकता, असे सरकारने स्पष्ट केले आहे. याशिवाय ज्यांच्या ठेवी अजूनही चालू आहेत त्यांना व्याज मिळत राहील आणि मुदतपूर्तीवर पैसे किंवा सोने मिळतील. जर तुम्हाला वेळेपूर्वी सोने काढायचे असेल, तर पूर्वीचे नियम लागू होतील, ज्यामध्ये कपात होऊ शकते. 26 मार्च नंतर काय होणार असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला तर? त्यामुळे आता नवीन सोने मध्यम आणि दीर्घकालीन योजनांमध्ये जमा करता येणार नाही. तर आधीच जमा केलेले सोने त्याच पद्धतीने चालू राहील.

किती सोने जमा केले?

अल्पकालीन: 7,509 किलो

मध्यम मुदत: 9,728 किलो

दीर्घकालीन: 13,926 किलो

या योजनेत एकूण 5,693 लोकांनी आपले सोने जमा केले होते.

सोन्याच्या दरात मोठी वाढ

1 जानेवारी 2024 रोजी सोन्याचा भाव 63,920 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो 25 मार्च 2025 पर्यंत 41.5 टक्क्यांनी वाढून 90,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्यामुळे तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली असेल, तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. सरकार तुमच्या ठेवींच्या सुरक्षिततेची हमी देत ​​आहे.

महत्वाच्या बातम्या:

लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणं अवघड, पुढच्या बजेटआधी पैसे मिळावेत, रामदास आठवलेंचा टोला

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सोन्याच्या दरात मोठी वाढ; भाव दीड लाखांच्या पुढे, तर चांदीचे दर घसरले, वर्षाच्या अखेरीस दरात 'इतक्या' हजारांंची वाढ होण्याची शक्यता, तज्ज्ञांनी दिली माहिती
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
कमी पगारातून सुरुवात, आज 75 लाखांची संपत्ती, 26 वर्षाच्या तरुणाची आदर्शवत कामगिरी, नेमकं कसं केलं नियोजन?  
कमी पगारातून सुरुवात, आज 75 लाखांची संपत्ती, 26 वर्षाच्या तरुणाची आदर्शवत कामगिरी, नेमकं कसं केलं नियोजन?  
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget