एक्स्प्लोर

Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांचा आदेश शिरसावंद्य मानला, थोड्याचवेळात राजीनामा देणार

Dhananjay Munde news: धनंजय मुंडे यांच्यासाठी राजीनामा द्यावा लागणे, सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. हे त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठे संकट आहे.

मुंबई: संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे क्रौर्याची परिसीमा दाखवून देणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी रात्री राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज धनंजय मुंडे हे आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार आहेत. धनंजय मुंडे हे एखाच्या व्यक्तीला राजीनामा घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील, असे समजते. साधारण 11 वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे आपला राजीनामा देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्द करण्याची शक्यता आहे.

संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो सोमवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची एक बैठक पार पडली. जवळपास दोन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीअंती देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना 'उद्या मंत्रि‍पदाचा राजीनामा द्या', अशी सूचना केली. त्यानुसार आता धनंजय मुंडे आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील आठवडाभरापासून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा, याविषयी खलबतं सुरु होती. देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. मात्र, अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास उशीर झाला, असे सांगितले जात आहे.

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली होती. याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी वाल्मिक कराड याचा सहभाग असल्याची चर्चा होती. नंतर एसआयटी आणि सीआयडीच्या तपासात वाल्मिक कराड या हत्याप्रकरणाचा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सीआयडीने न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला लढवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम आणि अॅडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता आरोपपत्र दाखल झाल्यामुळे लवकरच याप्रकरणाच्या सुनावणीला न्यायालयात सुरुवात होईल.

आणखी वाचा

एक डोळा अर्धोन्मिलित, डोळ्यांवर गॉगलची झापडं, मीडियाने प्रश्न विचारताच धनंजय मुंडे अडखळत म्हणाले....

देवेंद्र फडणवीस आग्रही, पण धनंजय मुंडे तयार नव्हते; काल बैठक अन् थेट आदेश, नेमकं काय घडलं?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Sunetra Pawar and Congress: सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं, हर्षवर्धन सपकाळांची प्रेस सुरु असताना राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण काँग्रेसच्या कार्यालयात घुसले अन्...
सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं, हर्षवर्धन सपकाळांची प्रेस सुरु असताना राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण काँग्रेसच्या कार्यालयात घुसले अन्...
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
Embed widget