IPL 2025: हैदराबाद, बंगळुरु टॉपवर, चेन्नई-मुंबई कुठे?; पाहा आयपीएलचे Latest Points Table
IPL 2025 Points Table: पंजाब किंग्सच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.

IPL 2025 Points Table: पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs Punjab Kings) 11 धावांनी पराभव केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने यंदाच्या आयपीएल हंगामाची सुरुवात विजयाने केली. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 243 धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरात टायटन्सला 20 षटकांत 5 गडी गमावून फक्त 232 धावा करता आल्या. पंजाब किंग्सच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.
Runs Galore ✅
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2025
Special knocks to savour ✅
Bowlers delivering under pressure ✅
🎥 Recap a captivating contest as Punjab Kings got off the mark in #TATAIPL 2025 with victory over Gujarat Titans🔝👌#GTvPBKS | @PunjabKingsIPL | @gujarat_titans pic.twitter.com/KmRQOxIXbx
आयपीएल 2025 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु झाला आहे. आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहे. या पहिल्या पाच सामन्यातच गुणतालिकेत अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. हैदराबादचे दोन गुण आहेत. नेटरनरेट इतर संघांच्या तुलनेत खूप चांगला असल्याने हैदराबादचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवणारा चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. या सर्व संघांचे 2-2 गुण समान आहेत.
Happy with your team's start this season? 👀#TATAIPL | #GTvPBKS pic.twitter.com/3stn7RVzvV
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2025
कोणत्या संघांचा पराभव झाला?
लखनौ सुपर जायंट्स व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांना पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. तर पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला. या हंगामातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. याशिवाय सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला.





















