मोठी बातमी! सोमनाथ सुर्यवंशी न्यायालयीन कोठडी मृत्यूप्रकरणाचा तपास CID कडे, कुटुंबीयांची न्यायासाठी हायकोर्टात याचिका
या चौकशीचा 451 पाणी गोपनीय अहवाल मानव अधिकार आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. सोमनाथ सुर्यवंशीचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तब्बल सव्वातीन महिन्यांनी हे प्रकरण आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलं आहे.

Parbhani: परभणी हिंसाचार प्रकरणात हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीत मृत्यू झाल्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तब्बल सव्वातीन महिन्यांनी सोमनाथ सुर्यवंशीच्या (Somnath Suryawanshi) न्यायालयीन मृत्यूप्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) कडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. 16 डिसेंबर 2024 रोजी परभणी हिंसाचारात न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला .यात हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याच्या समोर आले होते .यावर सातत्याने सूर्यवंशी कुटुंब न्यायाची मागणी करत आहे . दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी दिवंगत सोमनाथच्या आई आणि भावाची मागणी आहे .दरम्यान न्यायासाठी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचीकाही दाखल केली आहे .
हत्येचा गुन्हा दाखल करा, कुटुंबियांची मागणी
दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी आता सीआयडी कडून तपास केला जाणार आहे .मात्र आम्हाला न्याय हवाय .आता न्यायमूर्ती तेलगावकर यांच्या अहवालातही पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे .मात्र तरीही सरकार न्याय देत नाही .जे जे दोशी आहे तर त्यांच्यावर मनुष्यबदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचं सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी सांगितलं . यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे .जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढतच राहणार असल्याची प्रतिक्रिया सोमनाथच्या आई आणि भावाने दिली आहे .
दरम्यान परभणी हिंसाचार प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी च्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील दोषी पोलिसांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली आहे .सोमनाथ सूर्यवंशी च्या मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशी झाली .या चौकशीचा 451 पाणी गोपनीय अहवाल मानव अधिकार आयोगाकडे पाठवण्यात आला .या अहवालात जवळपास 70 पोलिसांवर या मारहाणीचा ठपका आहे .मानव अधिकार आयोगाने त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी त्यांना नोटीस जारी केली होती.
10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली होती .यानंतर परभणीत हिंसाचार उफाळला .पोलीस बळाचा वापर करावा लागला .यात अनेकांना कोठडीत ठेवण्यात आले .यात सोमनाथच सूर्यवंशीचाही समावेश होता . मात्र न्यायालयातच त्याचा मृत्यू झाला .हृदयविकाराच्या झटक्याने न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले .मात्र 16 डिसेंबर 2024 च्या सर्व विच्छेदन अहवालानुसार सोमनाथ सूर्यवंशी चा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतून झाल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती .
























