एक्स्प्लोर

तुळजापुर ड्रग प्रकरणात राजकीय कनेक्शन? आरोपींसोबत ओमराजे निंबाळकरांचे फोटो व्हायरल, तिकडे भाजप काँग्रेस पुन्हा जुंपली

अधिवेशनात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या ड्रग प्रकरणातील तुळजापूर आणि परंड्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.

Tuljapur: गेल्या काही दिवसांपासून तुळजापूर ड्रगप्रकरणी आरोपींची साखळी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र असताना या ड्रग तस्करी प्रकरणाचं राजकीय कनेक्शन आता समोर येत आहे. आता तुळजापूर ट्रक तस्करी प्रकरणावरून भाजप आणि महाविकास आघाडीत पुन्हा एकदा जुंपली आहे. या प्रकरणातील आरोपी सोबत खासदार ओमराज निंबाळकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.  तुळजापूर सारख्या शहरात ड्रग्स आढळून आल्याने राज्यभर या प्रकरणाची चर्चा झाली. मग हळूहळू या प्रकरणात मुंबई कनेक्शन समोर आलं. मुंबईतून एका महिलेकडून ड्रग्स खरेदी करत तुळजापूर शहरात येणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. आता या प्रकरणाचा राजकीय कनेक्शन समोर आलं असून तुळजापूरच्या उबाठा गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे आरोपी असून या दोन्ही आरोपीं सोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो व्हायरल झाल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. दरम्यान, या प्रकरणातील इतर काही आरोपी हे राणा जगजीतसिंह पाटलांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटलांनी केलाय. यावरून काँग्रेस आणि भाजप यावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत..  (Tuljapur Drug Case)

तुळजापूर सारख्या शहरात ड्रग्ज आढळून आल्याने पोलीस देखील सतर्क झाले आहे. तर या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण?, तुळजापूर शहरात कुठे ड्रग्स विक्री केली जाणार होती? या संपूर्ण बाबीचा आता पोलिसांकडून शोध सुरु असून तुळजापूर ड्रग प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 25 आरोपीअसून 14 आरोपी अटकेत आहेत तर 11 फरार आहेत .फरार आरोपींना पकडण्याचे तुळजापूर पोलिसांसमोर आव्हान आहे .

आरोपी राणा पाटलांचे कार्यकर्ते, काँग्रेसचा आराेप

तुळजापूर उबाठा गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे दोघंही ड्रग्ज तस्करी प्रकरणात आरोपी आहेत. यांच्यासोबतचे खासदार निंबाळकर यांचे फोटो व्हायरल करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट खासदारांवर निशाणा साधला आहे.  दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर इतर आरोपींचे फोटो दाखवत गंभीर आरोप केलाय .ड्रग्स प्रकरणातील इतर काही आरोपी राणा जगजीतसिंह पाटील यांचेच कार्यकर्ते असल्याचा दावा करत त्यांनी भाजपवर टीका केली आहे .

आमदार राणाजगजीत सिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्याकडून एकमेकाचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल केले जात आहेत .ड्रग्ज प्रकरणातील आरोपींचा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सोबत फोटो व्हायरल करण्यात आलाय.ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेले राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे यांचे ओमराजे निंबाळकरांसोबत फोटो आहेत. तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी चंद्रकांत कणे, विनोद गंगणे,  पिंटू मुळे भाजपशी संबंधित असल्याचंही सांगितलं जात आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासोबत ही आरोपीचे फोटो आहेत. 

राणा जगजितसिंह पाटलांसह ओमराजेंनी काय म्हटलं?

कोणाविरुद्धही पुरावे असतील तर कारवाई होईल जवळचा लांबचा असा विचार केला जाणार नाही असे उत्तर भाजप आमदार राणा पाटलांनी दिलं .मुख्यमंत्र्यांचे तुळजापूर ड्रग प्रकरणावर लक्ष असल्याची माहिती ही त्यांनी दिली .दरम्यान ड्रग्स प्रकरणात आरोपी कार्यकर्ता कुठल्याही व कोणाच्याही जवळचा असू द्या त्याला पाठीशी न घालता कार्यवाही करा अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे . संसदेच्या अधिवेशनात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या ड्रग प्रकरणातील तुळजापूर आणि परंड्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. हजारो भाविक येणाऱ्या तुळजापुरात  'ड्रग्ज' प्रकरण गेल्या एक-दीड वर्षापासून चांगलेच रंगत आहे.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एक माजी नगराध्यक्ष तर एक माजी नगराध्यक्षचा पती आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे आणि माजी नगराध्यक्षाचे पती विनोद गंगणे यांची नावे आरोपीच्या यादीत आता आली आहेत. या आरोपींचा ड्रग प्रकरणात संबंध असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता त्यांची नावे यादीत आली आहेत. तुळजापुरात मुंबई आणि सोलापुरातून ड्रग्ज पुरवठा होत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.

हेही वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Amol Mitkari On Ajit Pawar 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अजित पवारांना अमोल मिटकरांचं भावनिक पत्र
Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
Embed widget