एक्स्प्लोर

ATM Fee Hike : एटीएममधून पैसे काढणं 1 मे पासून महागणार, इंटरचेंज शुल्कामध्ये वाढ, जाणून घ्या बदल

ATM Fee Hike : आरबीआयच्या एका निर्णयानंतर एटीएममधून पैसे काढणं महागणार आहे. नवे नियम लवकरच लागू होणार आहेत. 

ATM Fee Hike नवी दिल्ली : नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या इंटरचेंज शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरचें शुल्क 17 रुपयांवरुन 19 रुपये करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा बदल 1 मे 2025 पासून लागू होणार आहेत. देशांतर्गत वित्तीय आणि गैर वित्तीय व्यवहारांसाठी इंटरचेंज शुल्कात दुरुस्ती करण्यात आली आहे. 

एनपीसीआयनं 13 मार्चला जारी केलेल्या पत्रकानुसार गैर वित्तीय व्यवहारांसाठी  7 रुपयांचं  इंटरचेंज शुल्क आकारलं जाणार आहे. याशिवाय इंटरचेंज शुल्काव्यतिरिक्त जीएसटी शुल्क देखील आकारलं जाणार आहे. या संदर्भातील वृत्त बिझनेस स्टँडर्ड या हिंदी वेबसाईटनं दिलं आहे.

एनपीसीआयनं यासंदर्भातील बदल लागू करण्यासाठी आरबीआयकडे मंजुरी मागितली होती. या संबंधात आरबीआयनं  11 मार्च 2025 ला लिहिलेल्या पत्रात एनपीसीआयला सूचना देण्यात आली होती. त्यामध्ये एटीएम इंटरचेंज शुल्क एटीएम नेटवर्क द्वारे निश्चित केल जाऊ शकतं, असं सांगण्यात आलं. याशिवाय नव्यानं निश्चित करण्यात आलेलं शुल्क लागू करण्यात येण्यासंदर्भातील तारीख आरबीआयला एनपीसीआयनं कळवावी, असं सांगण्यात आलं आहे. 

संशोधित इंटरचेंज शुल्क मायक्रो-एटीएम, इंटरऑपरेबल कॅश डिपॉझिट (कार्ड आधारित आणि यूपीआय आधारित) आणि आंतरराष्ट्रीय एटीएम व्यवहारांवर लागू नसेल. सध्या जे दर आकारले जातात ते कायम असतात. 

नेपाळ आणि भूतानमध्ये होणाऱ्या व्यवहारांवर शिल्लक तपासणीवर इंटरचेंज शुल्क 7 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. यावर जीएसटी शुल्क आकारलं जात नाही. 

एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार सध्या नॅशनल फायनान्शिअल स्विच सदस्यांची संख्या 1349 आहे, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 1296 इतकी होती. 

फेब्रुवारी 2025 मध्ये  एनएफएस अनुमोदित व्यवहारांची संख्या 31.5 कोटी इतकी होती. जी फेब्रुवारी 2024 मध्ये 36.5 कोटी  होती.  यामध्ये वार्षिक आधारावर 13.7 टक्के घसरण झाली. एनएफएस नेटवर्क नुसार एटीएमची संख्या देशभरात 2.65 लाख इतकी आहे. 

मोफत पैसे काढण्याची संख्या कमी होणार

एटीएम कार्ड वापरासंदर्भातील नियम देखील बदलले जाणार आहेत. समजा एखाद्या बँक खातेदारानं त्याचं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेऐवजी दुसऱ्या बँकेच्या एटीएम सेंटरवरुन पैसे काढले ठराविक व्यवहारानंतर शुल्क भरावं लागतं. सध्या दुसऱ्या बँकेच्या एटीएम सेंटरवरुन 5 वेळा मोफत पैसे काढता येतात. आता ही संख्या 3 पर्यंत आणली जाणार आहे.लवकरच हा नियम लागू होईल.    

इतर बातम्या :  

New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये पावसाचा धुमाकुळ ! सरस्वती, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला, कुठे काय परिस्थिती?
बीडमध्ये पावसाचा धुमाकुळ ! सरस्वती, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला, कुठे काय परिस्थिती?
Sangli News: जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करा; आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी
जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करा; आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी
Mumbai Heavy Rain: मुंबईला रेड अलर्ट, पुढील तीन तास महत्त्वाचे; रेल्वे ट्रॅक, रस्ते पाण्याखाली
Mumbai Heavy Rain: मुंबईला रेड अलर्ट, पुढील तीन तास महत्त्वाचे; रेल्वे ट्रॅक, रस्ते पाण्याखाली
शिवसेना आणि मनसे युतीची 'राज'कीय चर्चा, काँग्रेसचं दिल्लीत ठरणार, पण शरद पवारांचं काय? संजय राऊतांनी केला खुलासा!
शिवसेना आणि मनसे युतीची 'राज'कीय चर्चा, काँग्रेसचं दिल्लीत ठरणार, पण शरद पवारांचं काय? संजय राऊतांनी केला खुलासा!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये पावसाचा धुमाकुळ ! सरस्वती, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला, कुठे काय परिस्थिती?
बीडमध्ये पावसाचा धुमाकुळ ! सरस्वती, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला, कुठे काय परिस्थिती?
Sangli News: जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करा; आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी
जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करा; आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी
Mumbai Heavy Rain: मुंबईला रेड अलर्ट, पुढील तीन तास महत्त्वाचे; रेल्वे ट्रॅक, रस्ते पाण्याखाली
Mumbai Heavy Rain: मुंबईला रेड अलर्ट, पुढील तीन तास महत्त्वाचे; रेल्वे ट्रॅक, रस्ते पाण्याखाली
शिवसेना आणि मनसे युतीची 'राज'कीय चर्चा, काँग्रेसचं दिल्लीत ठरणार, पण शरद पवारांचं काय? संजय राऊतांनी केला खुलासा!
शिवसेना आणि मनसे युतीची 'राज'कीय चर्चा, काँग्रेसचं दिल्लीत ठरणार, पण शरद पवारांचं काय? संजय राऊतांनी केला खुलासा!
नितेश राणे विरुद्ध उदय सामंतामध्ये कलगीतुरा सुरुच; रंगीबेरंगी मफलर विरुद्ध भगवे मफलर वापरण्यावरून टोलेबाजी
नितेश राणे विरुद्ध उदय सामंतामध्ये कलगीतुरा सुरुच; रंगीबेरंगी मफलर विरुद्ध भगवे मफलर वापरण्यावरून टोलेबाजी
Mumbai Rain LIVE: मुंबईकरांनो सावधान, पुढील तीन तास जपून, अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अलर्ट
Mumbai Rain LIVE: मुंबईकरांनो सावधान, पुढील तीन तास जपून, अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अलर्ट
Ind vs Pak Asia Cup 2025 : टीम इंडियावर होणार कारवाई? पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल मॅच रेफरी घेणार अ‍ॅक्शन? नियम काय सांगतो जाणून घ्या
टीम इंडियावर होणार कारवाई? पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल मॅच रेफरी घेणार अ‍ॅक्शन? नियम काय सांगतो जाणून घ्या
Ashok Chavan VIDEO : काँग्रेसमध्ये खोटे आरोप अन् 14 वर्षांचा वनवास, तर भाजपने दिला सन्मान; अशोक चव्हाण काय म्हणाले?
काँग्रेसमध्ये खोटे आरोप अन् 14 वर्षांचा वनवास, तर भाजपने दिला सन्मान; अशोक चव्हाण काय म्हणाले?
Embed widget