एक्स्प्लोर

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा, आता भोगवटादार वर्ग 2 जमीनींवर तारण कर्ज मिळणार, महसूल विभागाचा मोठा निर्णय

आता जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांनाही या जमिनी तारण म्हणून घेता येणार आहेत. याबाबतचे स्मरणपत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.

Mumbai: राज्यातील भोगवटादार वर्ग 2 च्या जमीनी असणाऱ्या शेतकऱ्यांना आता बँकाकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. महसूल विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून राज्यभरातील भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना या जमीनींवर तारण कर्ज मिळणार आहे. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले असून लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.  हा निर्णय कोणत्याही एका बँकेपुरता मर्यादित नसून राज्यातील कोणत्याही बँकेतून कर्ज मिळणं सोपं होणार आहे. यापूर्वी 1990 मध्ये भोगवटादार वर्ग दोनच्या जमीनींबाबत परिपत्रक काढण्यात आले होते. (Agriculture) बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनाही पीककर्ज, शेती विकासासाठी मध्यम, दीर्घ मुदतीचे कर्ज देता येणार आहे. कर्जासाठी शासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही. (Revenue Ministry)

शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. मात्र, एखादा शेतकरी कर्ज परतफेड करु शकला नाही. तर बँक अडचणीत येते. अशावेळी बँकेने त्याच्याकडून तारण घेतलेली जमीन भोगावटा वर्ग 2 असेल तरी त्यावर बोजा चढविता येत नाही असे बँकांचे म्हणणे होते. त्यामुळे भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनी बँकेकडून तारण ठेवल्या जात नव्हत्या. तसेच शेतकऱ्यांना कर्जही मिळत नव्हते. आता जिल्हा बँकांबरोबरच राष्ट्रीयकृत बँकांनाही या जमिनी तारण म्हणून घेता येणार आहेत. याबाबतचे स्मरणपत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.

भोगवटा वर्ग 2 जमीनधारकांना मोठा दिलासा

या निर्णयामुळे राज्यातील भोगवटादार वर्ग 2 म्हणून जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर  होणार आहेत. आता भोगवटादार वर्ग दोनच्या जमीनीवर तारणकर्ज देता येणार आहे. याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले. सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांनी 11 मार्च रोजी भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनीबाबत बैठक घेऊन हा प्रश्न महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी हा निर्णय घेतलाय.  हा निर्णय केवळ एका बँकेपुरता मर्यादित न ठेवता राज्यातील सर्वच भोगवटादार वर्ग 2 खातेधारकांची अडचण लक्षात घेऊन त्यांना भोगावटादार वर्ग 2 च्या जमीनी बँकेला तारण घेता येणार आहे. 

भोगवटा वर्ग दोनच्या जमिनी म्हणजे काय?

ज्या जमिनी खातेदाराला विकण्याचा अधिकार असा खातेदार म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 . भोगवटा वर्ग दोन च्या जमिनींमध्ये. देवस्थानासाठी दिलेल्या इमानी जमीनी, हैद्राबाद अतियात जमिनी, वतन जमीन, वन जमीन, गायरान, पुन पुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो. अशा जमीनी विक्री साठी शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते.

हेही वाचा:

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय, तब्बल 23 वर्षांनंतर 8 हजार 669 नियमित पदे भरण्यात येणार 
महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय, तब्बल 23 वर्षांनंतर 8 हजार 669 नियमित पदे भरण्यात येणार 
आयुष्यात बाळासाहेब ठाकरेंचं फार मोठं स्थान, घरी बोलावून त्यांनी मला पदं दिली : नारायण राणे
आयुष्यात बाळासाहेब ठाकरेंचं फार मोठं स्थान, घरी बोलावून त्यांनी मला पदं दिली : नारायण राणे
Narayan Rane : नारायण राणे म्हणजे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस; मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमने, 74 वा वाढदिवस उत्साहात साजरा
नारायण राणे म्हणजे मोजमाप न ठेवणारा दिलदार माणूस; मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमने, 74 वा वाढदिवस उत्साहात साजरा

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget