एक्स्प्लोर

Dhananjay Munde Net Worth :धनंजय मुंडेंच्या ताफ्यात बुलेट ते मर्सिडीज बेन्झ, माजी मंत्र्यांकडे संपत्ती नेमकी किती?

Dhananjay Munde Net Worth : धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला असल्याचं सांगितलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो आरोपपत्रातून समोर आल्यानंतर राज्य सरकारवरील दबाव वाढला. यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीला धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल पटेल उपस्थित होते. या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी आज त्यांचा राजीनामा स्वीय सहायक प्रशांत जोशी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून ते आमदार म्हणून काम करतील. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ते राज्यातील सर्वाधिक मतांनी विजयी होणाऱ्या पहिल्या तीन आमदारांमध्ये होते. त्याच विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मालमत्तेचा तपशील दिला होता.  

धनंजय मुंडे यांची संपत्ती किती?  

माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचं दिसून आलं होतं. मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून ती माहिती समोर आलेली . धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला. त्यासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्तीची माहिती नमूद करण्यात आलेली. 2019 मध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे 23 कोटींची संपत्ती होती. 2024 मध्ये सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात 53.80 कोटींची संपत्ती नमूद करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. 

पाच वर्षात मुंडेंच्या संपत्ती 31 कोटींची वाढ

2019 ते  2024 पाच वर्षांमध्ये मुंडेंच्या संपत्ती सुमारे 31 कोटी रुपयांनी वाढली आहे. धनंजय मुंडे त्यांची पत्नी आणि कुटुंबाकडे 53 कोटी 80 लाखांची संपत्ती आहे. मागील पाच वर्षात यामध्ये दुपटीने म्हणजे 30.75 कोटी रुपयांची वाढ झाली. 2019 मध्ये त्यांच्याकडे 23 कोटींची संपत्ती होती. 

धनंजय मुंडे यांच्याकडे 15 कोटींची वाहने, दीड किलो चांदी आहे. तर त्यांच्या नावे 15 कोटी 55 लाख 5 हजार 105 रुपयांचे विविध वाहने आहेत. टँकर पासून ते बुलेट पर्यंतच्या सात वाहनांचा यात समावेश आहे. सात लाख तीन हजार रुपयांचे 190 ग्रॅम सोने आहे. 

तर पत्नीच्या नावे 31 लाख 78 हजार 675 रुपयांची दोन वाहने आहेत. 22 लाख 90 हजारांचे 620 ग्रॅम सोने आणि 72 हजारांची दीड किलो चांदी आहे.

धनंजय मुंडे यांचा राजकीय प्रवास

धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात भाजपमधून केली. भाजप सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना राज्याचं विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं होतं. ठाकरेंच्या सरकारच्या काळात ते सामाजिक न्याय मंत्री होते. एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये कृषीमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. 

इतर बातम्या : 

Dhananjay Munde Resignation: मोठी बातमी : धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा सोपवला, दोन सहकाऱ्यांकडून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला!

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या
Sonia Gandhi : 'आणीबाणी ही मोठी चूक होती...', सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा, गांधी कुटुंबातील वादाचा पडदा उघडला
'आणीबाणी ही मोठी चूक होती...', सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा, गांधी कुटुंबातील वादाचा पडदा उघडला
Rupali Chakankar and Ashok Kharat: तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या
Diwali : नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
Embed widget