एक्स्प्लोर
Pandharpur News: वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा; आकर्षक फुलांच्या सजावटीने मंदिर सजलं, पाहा PHOTOS
Pandharpur News: विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिर व लग्नविधी असणार विठ्ठल सभा मंडपास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Vasant Panchami Vitthal Rukmini Grand Wedding
1/5

आज वसंत पंचमी अर्थात श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिर व लग्नविधी असणार विठ्ठल सभा मंडपास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
2/5

वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा दुपारी संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलाची सजावट केली आहे.
3/5

मंदिराला फुलांची आकर्षक सजाव करण्यासाठी सुमारे साडेतीन ते चार टन फुलांचा आणि 1 टन ऊसाचा वापर करण्यात आला आहे.
4/5

या सजावटीमध्ये जिप्सी, डिजी, सुर्यफुल, गुलाब, रेड गुलाब, पांढरा गुलाब, पिंक गुलाब, पिवळा गुलाब, जरबरा, ऑर्किङ जिनेियम, तगर, गुलछडी, कामिनी, तुक्स, गोंडा (लाल पिवळा) बिजली, अस्टर, शेवंती, पासली, काडी, गिलाडो, डीर्शना अशा फुलांचा वापर करण्यात आला आहे.
5/5

श्रींचा गाभारा, विठ्ठल सभामंडप, श्री संत नामदेव महाराज पायरी, उत्तर द्वार , सोळखांबी, रुक्मिणी सभामंडप, मिरवणूक रथ या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे. याकरिता सुमारे 100 कारागिरांनी रात्रभर परिश्रम घेतले आहेत.
Published at : 02 Feb 2025 09:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
