एक्स्प्लोर

Ram Kadam: सुशांतच्या मृत्यूनंतर 68 दिवसांत घराला रंग मारला अन्... राम कदमांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Ram Kadam on Uddhav Thackeray: सुशांत सिंह राजपूत प्रकरणी उद्धव ठाकरे सरकारने पुरावे नष्ट केले का? याबाबत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी विधानसभेत केली आहे.

मुंबई - दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबाबत आज (बुधवारी) विधानसभेमध्ये पुन्हा आरोप प्रत्यारोप करण्यात आले. दिशा सालियनसह   सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही तेच घडले असेल. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी बिहार पोलिसांना चौकशी करण्यास विरोध केला गेला. त्या काळात दररोज शिवसेना उबाठा गटाचे नेते रिया चक्रवर्तीच्या बाजूने बोलत होते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी उद्धव ठाकरे सरकारने पुरावे नष्ट केले का? याबाबत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी विधानसभेत केली आहे. 

पुरावे नष्ट करायचे होते का?

विधानसभेत दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि सुशांत सिंह राजपूत या प्रकरणी बोलताना भाजपा आमदार राम कदम म्हणाले, ज्यावेळी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला, तो कोविड काळ होता. सुशांत सिंह राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीच्या बाजूने काही नेते बोलत होते. सुशांत सिंह राजपूतचा ज्या फ्लॅटमध्ये मृत्यू झाला, तो चौकशीसाठी ताब्यात ठेवला पाहिजे होता. मात्र, तो फ्लॅट घाईघाईने उद्धव ठाकरे सरकारने मूळ मालकाला परत केला. त्या फ्लॅटमध्ये 68 दिवसांत सर्व फर्निचर काढले गेले. रंगरंगोटी केली. पुरावे नष्ट करायचे होते का? रिया चक्रवर्तीच्या बाजूने ठाकरे गटाचे नेते बोलत होते. पहिल्या दिवसापासून यांच्या मनात खोट नव्हती मग हे प्रकरण सीबीआयला का दिले नाही. बिहारचे पोलीस चौकशीला येतात, त्यांना तपास करण्यास का अडवले? 68 दिवसानंतर सीबीआयला चौकशीसाठी हे प्रकरण दिले गेले, तोपर्यंत सगळे पुरावे नष्ट केले होते का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

ठाकरेंना कोणाला वाचवायचं होतं?

पुढे बोलताना राम कदम म्हणाले, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे सरकारची काय भूमिका याची चौकशी झाली पाहिजे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ते प्रकरण सीबीआयकडे दिलं नाही. ठाकरेंना कोणाला वाचवायचं होतं. 68 दिवसात सुशांतचा मृत्यू झालेल्या घरात पेंट मारला, साहित्य दिलं. त्यानंतर घर मूळ मालकाकडे परत केलं गेलं. घाई गडबडीत सुशांतच प्रकरण सीबीआयकडे दिलं नाही. सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट सादर केला, कारण सर्व पुरावे नष्ट केल्यानंतर प्रकरण दिलं गेलं. या प्रकरणी नवी एसआयटी (SIT) स्थापन करा. ठाकरे गटाचे नेते उभे राहून चौकशी करू नका म्हणत होते. मी बोलायला लागलो की वेलमध्ये उतरले. यात बड्या नेत्याचा हात असल्याने हे विरोध करत होते. दिशा सालियान प्रकरणातील एसआयटी (SIT) सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही चौकशी करेल असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sahar Shaikh Mumbra AIMIM: नगरसेवकपद धोक्यात, मग नॉट रिचेबल...सहर शेख वानखेडेवर, स्टोरी पोस्ट करत म्हणाल्या, गेम ओव्हर!
नगरसेवकपद धोक्यात, मग नॉट रिचेबल...सहर शेख वानखेडेवर, स्टोरी पोस्ट करत म्हणाल्या, गेम ओव्हर!
Uddhav Thackeray Vidhan Parishad Election 2026: उद्धव ठाकरे विधानपरिषद लढवणार की नाही?; बिनविरोध निवडणुकीचा खेळ ठाकरेंच्या उमेदवारीवर ठरण्याची शक्यता
उद्धव ठाकरे विधानपरिषद लढवणार की नाही?; बिनविरोध निवडणुकीचा खेळ ठाकरेंच्या उमेदवारीवर ठरण्याची शक्यता
Live Blog Updates: लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर मतदान
Live Blog Updates: लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर मतदान
Nashik Crime News: नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer Catch Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Video: एका टप्प्यावर मुंबई दोनशेपार दिसत होती, मात्र का झाली नाही? कॅप्टन श्रेयस अय्यरच्या अवघ्या चार शब्दांच्या उत्तरानं सर्वांनाच जिंकलं!
Donald Trump : आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
आसिम मुनीर तेहरानमध्ये दाखल, तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांचा पाकिस्तानवर प्रेमाचा वर्षाव; शांतता कराराबाबत केली मोठी घोषणा, म्हणाले, इराणसोबत लवकरच...
Hardik Pandya: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Video: 'जबाबदारी घ्यावीच लागेल', पंजाबने धुळ चारताच हार्दिक पांड्या कुणावर भडकला? तिकडं सेहवागनं सुद्धा भळभळत्या जखमेवर मीठ चोळलं!
Nashik Crime News: नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ
Amravati Crime: 'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
'बॉस' लिहलेला टी-शर्ट, भर रस्त्यात बर्थडे सेलिब्रेशन, चक्क वर्दीतल्या पोलिसांनीच आरोपी अयानला केक भरवला; अमरावतीच्या परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवं वळण
Nashik Crime News: नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात परदेशातून फंडिंग? आता थेट NIA करणार तपास, राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही नाशिकमध्ये येणार
नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात परदेशातून फंडिंग? आता थेट NIA करणार तपास, राष्ट्रीय महिला आयोगाची टीमही नाशिकमध्ये येणार
Dilip Kumar Nephew Ayub Khan Flop In Bollywood: सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
सुपरस्टार दिलीप कुमार यांचा पुतण्या, पण बॉलिवूडमध्ये नाही चालला 'या' अभिनेत्याचा पत्ता; 32 फिल्म 30 शो करुनही ठरला 'सुपरफ्लॉप'
Sangli Crime News: किरकोळ वादनं संतापाचं टोक गाठलं; पोटच्या लेकाने आईला संपवलं, सांगली जिल्ह्यातील मानमोडी गाव हादरलं
किरकोळ वादनं संतापाचं टोक गाठलं; पोटच्या लेकाने आईला संपवलं, सांगली जिल्ह्यातील मानमोडी गाव हादरलं
Embed widget