एक्स्प्लोर

Suresh Dhas & Pankaja Munde: पंकजा मुंडेंना बीड नव्हे तर ट्रम्प-बायडेनबद्दल प्रश्न विचारा, त्या इंटरनॅशनल नेत्या; सुरेश धसांचा हल्लाबोल

Santosh Deshmukh case in beed: संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपपत्र दाखल. संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

मुंबई: काही दिवसांपूर्वी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना 'मला तुम्ही सारखे बीड जिल्ह्याचे प्रश्न का विचारता, मी आता पुण्यात आले तर पुण्याबद्दल विचारा', अशी तंबी राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना टोला लगावला. पंकजा मुंडे या आता इंटरनॅशनल कॅटेगरीच्या नेत्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना जागतिक परिस्थितीबाबतचे प्रश्न विचारा, असे सुरेश धस यांनी म्हटले.

माझी मीडियाला नम्र विनंती आहे की, आमच्या पंकजाताईंना राज्य सरकारने पर्यावरण विभागाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांना संपूर्ण देशात आणि जगात पर्यावरणाचे प्रश्न बघावे लागतात. त्यामुळे तु्म्ही पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्याचे प्रश्न विचारत जाऊ नका. कारण त्यांना बीड बीड जिल्ह्याबद्दल सोयरंसुतक राहिलेलं नाही. इथून पुढे तुम्ही त्यांना डोनाल्ड ट्रम्प, बायडन, पुतीन, गाझा पट्टी, डेन्मार्क जर्मनी या देशांतील हवामानाचे प्रश्न विचारत जा. बीड जिल्ह्यात इतकी दुर्दैवी घटना घडली आहे. माझी पंकजा मुंडे यांना विनंती आहे की, आतातरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटून या. संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख हे दोघे भाऊ भाजपचे बुथप्रमुख होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी भाजपच्या बुथवर काम केले आहे. पंकजा मुंडे यांच्याकडून किमान आपल्या बुथप्रमुखाच्या बाबतीत असंवेदेशनली वक्तव्य होईल असं वाटलं नव्हतं, असे सुरेश धस यांनी म्हटले. पंकजा मुंडे म्हणतात की, बीड जिल्ह्याचे प्रश्न काय विचारता पुण्याचे विचारा. त्याच्यापेक्षा त्यांना बीड जिल्हा काय, राज्य आणि देशपातळीवरचे प्रश्नही विचारु नका. त्या आता इंटरनॅशनल कॅटेगरीच्या नेत्या झाल्या आहेत. त्यांना तेच प्रश्न विचारा, असे सुरेश धस यांनी म्हटले.

पंकजा मुंडे नेमंक काय म्हणाल्या होत्या?

पंकजा मुंडे या काही दिवसांपूर्वी पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी पंकजा मुंडे यांना संतोष देशमुख हत्याप्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राविषयी विचारण्यात आले. त्यावेळी पंकजा मुंडे प्रसारमाध्यमांवर संतापल्या होत्या. दोषारोपपत्रात काय लिहिले आहे, ते मला माहीत नाही. तुमच्यावर कोर्ट ऑफ कन्टेट दाखल होईल. बीडचा विषय मागे पडला आहे. तुम्हाला टार्गेट दिले आहे, ते प्रश्न तुम्ही विचारत आहे. मी पुण्यात आहे. पुण्याचे प्रश्न विचारा, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते.

संतोष देशमुख प्रकरणाची मला माहिती नाही. हे सगळे गृह खात्याकडे असते. त्यांना माहिती असेल. संतोष देशमुख यांच्या हत्येता मी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्याची वेगळी चौकशी करावी, अशी मी मागणी केली आहे. या प्रकरणातील सखोल माहिती माझ्याकडे नाही. तसेच या विषयावर बोलण्याची माझी जबाबदारी नाही. माझ्याकडे गृहखाते नाही. गृहखाते आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणीस या प्रकरणी लक्ष घालून आहेत. दोषींवर नक्की कारवाई होईल. हे प्रकरण संवेदनशील आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. जलदगतीने चौकशी झाली पाहिजे. आरोपीला शिक्षा द्यावी हे मी आधीच बोलले आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

धस म्हणाले, देवेंद्र फडणवीस बाहुबली, मी शिवगामी, मेरा वचन ही है शासन : पंकजा मुंडे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Supriya Sule on Parth Pawar: पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Solpaur Mahapalika : सोलापुरातील जेष्ठ नागरिकांना कौल कुणाला? समस्या काय?
Nashik BMC Elections: 'नाशिक बकाल झालंय, चांगले रस्ते नाहीत', नागरिकांचा प्रशासनावर संताप
Sambhajinagar Mahanagarpalika: संभाजीनगरला पाणी कधी? योजनेच्या खर्चावरून घमासान
Nagpur BMC : गेल्या आठ वर्षात नागपुरात नेमकं काय बदललं?
Parth Pawar Notice :  दोन टक्के मुद्रांक शुल्क भरा, पार्थ पवार प्रकरणात मुद्रांक शुल्क विभागाची नोटीस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
इंदुरीकर महाराजांचं ट्रोलर्संना सडेतोड उत्तर; लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून डिवचणाऱ्यांना स्पष्टच सांगितलं
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही; पार्थ पवार जमीनप्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Supriya Sule on Parth Pawar: पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
पार्थ पवारांवर महार वतनाच्या 1800 कोटींच्या जमिनीवर 300 कोटीत डल्ला मारल्याचा आरोप; आत्या सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
आई-वडिलांवर कुऱ्हाडीने घाव घातला, नंतर स्वतःलाही संपवलं... एकाच दिवशी कुटुंब संपलं, बुलढाण्यातील थरार
Sangli News: थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
थेट नगराध्यक्ष लढतीसाठी जयंत पाटलांकडून राज्यातील पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले
Video: पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचं मौन; पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर न देताच निघून गेले
Video: पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचं मौन; पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर न देताच निघून गेले
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत रमेश परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंनी संघाचा म्हणत रमेश परदेशीला झापलं; मुळशी पॅटर्न फेम अभिनेता पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
Embed widget