Astrology : आज मालव्य राजयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशी होतील मालामाल, धनलक्ष्मी देवी होईल प्रसन्न
Astrology Panchang Yog 28 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 28 March 2025 : वैदिक पंचांगानुसार, आज 28 मार्चचा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. आजच्या दिवशी मालव्य राजयोगसारखा दिव्य संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. तसेच, आज चंद्राचा मीन राशीत प्रवेश होऊन पंचग्रही योगसुद्धा निर्माण झाला आहे. आजच्या दिवशी मालव्य राजयोगासह अनेक राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला जाणार आहे, आज तुम्हाल ाअचानक धनलाभ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुमच्या पदप्रतिष्ठेत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या कामाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तुमचं जीवन आनंददायी राहील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. तसेच, तुम्हाला लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तसेच, नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली दिवसांपैकी एक असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या उत्पन्नातून चांगला लाभ मिळे. तुमच्या कामावर तुमचा बॉस खुश असेल.तसेच, तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला पाहायला मिळेल. आज कोणतीच चिंता करण्याची गरज नाही. जोडीदाराबरोबर चांगला संसार कराल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज सरकारी योजनांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. तसेच, जर तुम्हाला नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. देवी लक्ष्मी तुमच्या कामावर प्रसन्न असेल त्यामुळे मनमोकळेपणाने जगा. आनंदी राहा.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आज जुळून आलेला शुभ योग फार शुभकारक ठरणार आहे. तुमच्याबरोबर सर्व मंगलमय गोष्टी घडतील. तसेच, आज काही कामानिमित्त दूरचे नातेवाईक तुमच्या घरी येण्याची शक्यता आहे. त्यांचा चांगला पाहुणचार करा. लक्ष्मीच्या पावलांनी घरात पाहुणे आल्यास शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope Today 28 March 2025 : आजचा दिवस 3 राशींसाठी ठरणार भाग्यशाली; देवी लक्ष्मीच्या कृपेने धनवान राहतील 'या' राशी; आजचे राशीभविष्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
