एक्स्प्लोर
April Monthly Horoscope 2025 : खर्च वाढणार, कर्जाचा डोंगर उभा राहणार; एप्रिल महिन्यात 'या' 4 राशींच्या खिशाला लागणार कात्री, मासिक राशीभविष्य
April Monthly Horoscope 2025 : एप्रिल महिना ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. हा महिना अनेक राशींसाठी आव्हानात्मक असणार आहे.
April Monthly Horoscope 2025
1/10

एप्रिल 2025 च्या सुरुवातीलाच मीन राशीत सूर्य, शनी , राहू यांसारख्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. मात्र, या दरम्यान काही राशींसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
2/10

मेष राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा महिना चढ-उतारांचा असणार आहे. या महिन्यात तुमच्यावर कामाचा वाढता ताण असेल. तसेच,नोकरी शोधण्यात तुम्हाला ताण येऊ शकतो.
3/10

या कालावधीत तुमचं आर्थिक नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागेल. यामुळे तुम्ही मानसिक तणावात असाल.
4/10

सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा महिना काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.
5/10

तसेच , अनेक आजारांनी तुम्ही त्रस्त असाल. विशेष करुन महिनांला सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. तसेच, पैशांचा जपून वापर करा.
6/10

कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा महिना धावपळीचा असणार आहे. या काळात तुम्हाला छोटी-मोठी कामे करण्यासाठी देखील जास्त वेळ लागेल. तसेच, तुमची जास्त ऊर्जा खर्च होईल.
7/10

तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. शुभ कार्यात अडथळे येऊ शकतात. तसेच, तुमच्यावर कर्ज घेण्याची देखील वेळ येऊ शकते.
8/10

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा महिना संघर्षाचा असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात तुम्हाला अनेक अडथळे येतील. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होणार नाहीत.
9/10

मात्र, महिन्याचा दुसरा आठवडा फार लाभदायक ठरेल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असेल.
10/10

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 28 Mar 2025 10:01 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
क्रिकेट


















