एक्स्प्लोर

Kunal Kamra & Sushma Andhare : मोठी बातमी : कुणाल कामरा, सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला; आजच नोटीस धाडण्याची शक्यता, दोघांच्या अडचणी वाढणार?

Kunal Kamra & Sushma Andhare : कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात प्रविण दरेकर यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता.

Kunal Kamra & Sushma Andhare : कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) आपल्या नया भारत या कॉमेडी शोमधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला होता. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्या दाढी, चष्म्यावरुन आणि शिवसेना पक्षातील बंडावरुन एका गाण्याचे विडंबनात्मक गाणे गायले. कुणाल कामराचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले. काही शिवसैनिकांनी कुणाल कामराने (Kunal Kamra) जिथं हे गाणं गायलं, त्या स्टुडिओची तोडफोड केली. तसेच, कामराविरुद्ध मुंबईतील काही पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या  उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी कुणाल कामराचं गाणं म्हटल्याचा व्हिडिओ समोर आला. याचे पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात देखील उमटले. यानंतर कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात विधानपरिषदेचे सदस्य आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी बुधवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. आता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्या विरोधातील हक्कभंग स्वीकारण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

सुषमा अंधारे यांनी बोलताना वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा आणि कुणाल कामराने हेतूपूरस्पर उपमुख्यमंत्री यांच्यावर वैयक्तिक आणि उपरोधिक केलेले गाणे यातील भाषा एकप्रकारे सभागृहाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग मांडण्यास अनुमती द्यावी, अशी विनंती प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्यावर सभापती राम शिंदे यांनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडं योग्य त्या कारवाईसाठी पाठवित असल्याचे जाहीर केले होते. 

कुणाल कामरा, सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला

आता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्या विरोधातील हक्कभंग स्वीकारण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सभापती राम शिंदे यांच्या सहीनंतर हा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्यात आला आहे. हक्कभंग समितीकडून कदाचित आजच सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना खुलासा करण्याबाबत नोटीस पाठवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा नेमका काय खुलासा करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मोठी बातमी! कुणाल कामरा अन् सुषमा अंधारेंविरुद्ध विधिमंडळात हक्कभंग दाखल; शिवसेना नेत्याची पहिली प्रतिक्रिया

'एकनाथला सांग, मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावं लागतंय, मनात काही काळं ठेऊ नको'; संजय राऊतांनी फोन केल्याचा म्हस्केंचा दावा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
ऑपरेशन टायगरची गरज नाही, आता साध्या गोळीवरही लोक माझ्याकडे येतात, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
ऑपरेशन टायगरची गरज नाही, आता साध्या गोळीवरही लोक माझ्याकडे येतात, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
मी तुमच्यासारखा पाच पक्ष बदलत नाही, शिवसेनेतील महेश शिंदेंच्या ऑफरला शशिकांत शिंदेंचं शेलक्या शब्दात प्रत्युत्तर
मी तुमच्यासारखा पाच पक्ष बदलत नाही, शिवसेनेतील महेश शिंदेंच्या ऑफरला शशिकांत शिंदेंचं शेलक्या शब्दात प्रत्युत्तर

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
Iran War Live Update: आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं..; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा''
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
Embed widget