Sanjay Raut on Disha Salian Case : दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
Sanjay Raut on Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मालवणी पोलिसांनी दिलेल्या क्लोजर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. यानंतर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Sanjay Raut on Disha Salian Case : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिह राजपूतची माजी मॅनेंजर दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण (Disha Salian Case) गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे. आता या प्रकरणात मालवणी पोलिसांनी याआधी दिलेल्या क्लोजर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. दिशा सालियनच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारणे आहेत. दिशा सालियान ही आर्थिक विवंचनेत होती. सतीश सालियान यांचे विवाहबाह्य संबंध होते. तर ते एका महिलेला पैसे देत असल्याचे क्लोजर रिपोर्टमधून समोर आले आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, काल पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला आहे. आता त्यांचे वडील असं का करत आहेत? हे त्यांनाच माहिती, आमच्यासाठी तो विषय संपला आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत राजकारण करू नका. शवविच्छेदन अहवालातून सत्य समोर आलेले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न
संजय राऊत पुढे म्हणाले की, त्या मुलीला डिप्रेशन होतं, हा त्यांचा कौटुंबिक आणि व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यावर आम्हाला राजकारण करायचे नाही. आता पाच वर्षांनी तिच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करत आहेत, ते त्यांना लखलाभ होवो. पोस्टमॉर्टम रिपोर्ट कालच आलेला आहे. इतर काही गोष्टी समोर येत आहेत. आम्ही समर्थ आहोत, आदित्य ठाकरे समर्थ आहेत. उद्धव ठाकरे समर्थ आहेत, अशा घाणेरडा विषयाचे राजकारण करून महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करू इच्छिता. बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावता आणि आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार वाहक आहोत, असे म्हणतात, त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत, अशी टीका त्यांनी यावेळी शिवसेना शिंदे गटावर केली.
...तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना चाबकाने फोडले असते
गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु असतानाच मनसेच्या एका बॅनरने सर्वाचेचं लक्ष वेधून घेतले आहे. मनसेच्या गुढीपाडावा मेळाव्याच्या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा फोटो झळकला आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की, तुम्ही माझा फोटो वापरू नका. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर निवेदन केले होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे जीवित होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत गेले. राष्ट्रपुरुषांचा फोटो वापरण्यावरती कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. राष्ट्रपुरुष एका व्यक्तीचा किंवा एका कुटुंबाचा होत नाही, याचा फायदा जर कोणी घेत असेल तर त्यांनी घ्यावा. एकनाथ शिंदे यांचे लोक देखील बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरतात. बाळासाहेब ठाकरे जर आज हयात असते, तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना मातोश्रीच्या बाहेरच्या चाबकाने फोडले असते, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
