Chhaava Box Office Collection Day 42: 'छावा' दमदार, कमाई जोरदार; 42व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवली, 600 कोटींचा टप्पा गाठणार?
Chhaava Box Office Collection Day 42: दीड महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'छावा'नं नुकत्याच रिलीज झालेल्या 'L2Mpuran'समोर खळबळ उडवून दिली आहे. 42 व्या दिवशी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे.

Chhaava Box Office Collection Day 42: विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर 'छावा'नं (Chhaava Movie) अद्भुत कामगिरी केली आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये सुरू होऊन जवळजवळ दीड महिना उलटला आणि अजूनही 'छावा' (Chhaava) थकण्याची चिन्ह दिसत नाहीत. चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील (Box Office) आकडे जबरदस्त आहेत आणि त्यामुळे या चित्रपटानं निर्मात्यांच्या तिजोरीत बक्कळ भर घातली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आश्चर्याची बाब म्हणजे, रिलीजच्या सहाव्या आठवड्यातही 'छावा'नं दररोज कोट्यवधींची कमाई केली आहे. 'छावा'नं रिलीजच्या 42 व्या दिवशी म्हणजेच, सहाव्या गुरुवारी किती कोटींची कमाई केली? हे सविस्तर जाणून घेऊयात...
'छावा'नं 42 व्या दिवशी किती कोटींची कमाई केली?
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याच्या गाथेवर आधारित 'छावा' चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अशा परिस्थिती गेल्या दीड महिन्यांपासून चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे. 'छावा'च्या धमाकेदार कलेक्शनचा विचार केला, तर तो अद्याप मोठ्या पडद्यावरून बाहेर पडण्यास तयार आहे, असं वाटत नाही. गंमतीशीर बाब म्हणजे, विक्की कौशल स्टारर हा चित्रपट 2025 सालचा सर्वात मोठा ओपनर चित्रपट ठरला आहेच, पण या चित्रपटानं अनेक मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांचे रेकॉर्डही मोडले आहेत.
View this post on Instagram
'छावा'च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 180.25 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 84.05 कोटी, चौथ्या आठवड्यात 55.95 कोटी आणि पाचव्या आठवड्यात 33.35 कोटी रुपये कमावले. चित्रपटाने 36 व्या दिवशी 2.1 कोटी रुपये, 37 व्या दिवशी 3.65 कोटी रुपये, 38 व्या दिवशी 4.65 कोटी रुपये, 39 व्या दिवशी 1.6 कोटी रुपये, 40 व्या दिवशी 1.5 कोटी रुपये आणि 41 व्या दिवशी 1.4 कोटी रुपये कमावले. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 42 व्या दिवशीच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छवा'नं रिलीजच्या 42 व्या दिवशी म्हणजेच, सहाव्या गुरुवारी 1.4 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासह, 42 दिवसांत 'छवा'चं एकूण कलेक्शन आता 589.15 कोटी रुपये झालं आहे.
L2Mpuran च्या रिलीजचा 'छावा'वर कोणताच परिणाम नाही
'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 42 दिवसांनीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या एल2 एम्पुरानच्या रिलीजचाही या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम झालेला नाही. 'छावा'नं 42 व्या दिवशीही कोटींचा गल्ला जमवला आहे.
सिकंदर बिघडवणार 'छावा'चा खेळ
'छावा' सध्या 600 कोटींचा टप्पा ओलांडण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे. पण सलमान खानचा सिकंदर 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. सिकंदरची लोकप्रियता पाहता, त्याला बंपर ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, सिकंदरच्या आगमनामुळे 'छावा'च्या कमाईवर ब्रेक लागू शकतो, असं म्हटलं जात आहे. अशातच आता 'छावा' सिकंदरसमोर 600 कोटींचा टप्पा गाठणार की, नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























