Shreyas Talpade Case: 'पुष्पाभाऊ'ला अटक होणार? 'टोरेस' स्टाईलनं कोट्यवधी बळकावले, अभिनेत्यावर फसवणुकीचा गुन्हा
Shreyas Talpade: 'पुष्पाभाऊ'ला आवाज देणारा बॉलिवूडचा मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे सध्या अडचणींत सापडला आहे. अभिनेत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shreyas Talpade Case: बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता (Pushpa Fame Actor) श्रेयस तळपदेसह (Shreyas Talpade) 15 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महोबा येथील एका चिट फंड कंपनीच्या नावावर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा खटला सुरू आहे. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे या कंपनीत प्रमोटर म्हणून काम करत होता.
कंपनी लोकांचे पैसे घेऊन पळाली
मिडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस तळपदे ज्या कंपनीत काम करत होता. त्या चिट फंड कंपनीचं नाव LUCC आहे. या कंपनीनं लोकांना पैसे कमविण्याचं स्वप्न दाखवून कोट्यवधी रुपये वसूल केले आणि त्यानंतर पळ काढला. ही कंपनी लोनी अर्बन मल्टी स्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या नावानं कार्यरत होती.
'या' लोकांविरोधात खटला दाखल
श्रेयस तळपदेसह समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आरके शेट्टी, संजय मुदगिल, ललित विश्वकर्मा, दालचंद कुशवाह, सुनील विश्वकर्मा, सचिन रायकवार, कमल रायकवार, सुनील रायकवार, महेश रायकवार, मोहन कुशवाह, जितेंद्र नामदेव, नारायण सिंह राजपूत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
एलयूसीसी चिटफंड कंपनी गेल्या 10 वर्षांपासून महोबा येथे कार्यरत होती. ज्यांनी रक्कम दुप्पट करण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली. आता, कलम 419 आणि 420 अंतर्गत सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.
आगामी चित्रपटात श्रेयस तळपदे दिसणार
श्रेयस तळपदेच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, सर्वात शेवटी 'द इंडिया स्टोरी' चित्रपटात दिसला होता. आता लवकरच श्रेयस 'वेलकम टू द जंगल' चित्रपटात दिसणार आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार, रवीना टंडन सारखे अनेक मोठे स्टार दिसतील. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. श्रेयस मराठी चित्रपटसृष्टीतही सक्रीय आहे. सध्या झी मराठीवरील चल भावा सिटीत या रिअॅलिटी शोचं तो सूत्रसंचालन करत आहे. तसेच, श्रेयस तळपदे अनेक साऊथ फिल्म्स हिंदीमध्ये डब होताना, त्यातील सुपरस्टार्सना आपला आवाज देतो. ब्लॉकबस्टर सिनेमा पुष्पा हिंदीत डब केल्यानंतर श्रेयसनं लीड अॅक्टर अल्लू अर्जुनला आपला आवाज दिला आहे.
'पुष्पाभाऊ'ला आवाज दिल्यामुळे श्रेयसला मिळाली नवी ओळख
'पुष्पा' आणि 'पुष्पा 2' या दोन्ही चित्रपटांमध्ये अल्लू अर्जुनच्या आवाजात श्रेयस तळपदेनं जोरदार पुनरागमन केलं आहे. 'पुष्पा 2' जितका सर्वांना आवडला, तितकाच श्रेयस तळपदेनं जो आवाज दिलाय तोसुद्धा सर्वांना आवडला.
























