एक्स्प्लोर
Maharashtra Protest : त्रिपुरा घटनेचे महाराष्ट्रात पडसाद! ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवला...

(File Photo)
1/11

त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या काही भागात उमटले आहेत.
2/11

मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडी येथे मुस्लिम समाजानं मोर्चे काढले. ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांना हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. मोर्चादरम्यान मालेगाव, नांदेड, अमरावतीत झालेली तोडफोड कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
3/11

राज्यात काही ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ काही ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे.
4/11

त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीला हिंसक वळण लागलं आहे.
5/11

अमरावती शहरात हिंदू संघटनेच्या वतीने मोठ्या घोषणाबाजी सुरू... अमरावती शहरात नागपूरचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील दाखल..
6/11

अमरावतीत बंदला हिंसक वळण, पोलिसांचा लाठिचार्ज, आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी
7/11

नागरिकांनी शांतता राखावी, अमरावती वगळता सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे.- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
8/11

आंदोलन करणे हा तुमचा अधिकार आहे, पण हिंसक आंदोलन करू नये- नवाब मलिक
9/11

कोण काय मागणी करेल हा त्यांचा प्रश्न आहे, पण योग्य ती सरकार कारवाई करेल- - नवाब मलिक
10/11

त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ आंदोलनात महाराष्ट्रात काही ठिकाणी तोडफोड झाल्याच्या पार्श्वभूमिवर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी खंत व्यक्त करून शांततेचे आवाहन केले आहे.
11/11

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दुर्गापूजेदरम्यान बांग्लादेशात हिंसाचार झाला. बांग्लादेशातील चांदपूर, कमिला जिल्ह्यांमध्ये दुर्गापूजेदरम्यान तोडफोड करण्यात आली. दुर्गापूजा स्थळावर कुराण आढळल्याच्या आणि कुराणाचा अपमान झाल्याच्या कथित प्रकरणानंतर हिंसाचार सुरु झाला. त्यानंतर चांदपूरमधील हाजीगंज, चट्टोग्राममधील बंशखली, चपैनवाबगंज, काक्स बाजार या परिसरात घरांची, मंदिरांची तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारात काही जणांचा मृत्यू झाला. अनेक नागरिक जखमी झाले.
Published at : 13 Nov 2021 11:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
