Beed Jail Gang War: गिते गँगने जेलमध्ये वाल्मिक कराड अन् सुदर्शन घुलेला घेरलं, तुंबळ हाणामारी, बीड जिल्हा कारागृहात नेमकं काय घडलं?
Beed Crime news: बीड जिल्हा कारागृहात बबन गिते आणि वाल्मिक कराड गँगची हाणामारी झाल्याची माहिती आहे. सुदर्शन घुले याला मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.

बीड: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गुन्हेगारीचे केंद्र म्हणून कुख्यात झालेल्या बीड जिल्ह्यातील तुरुंगही आता सुरक्षित राहिलेला दिसत नाही. कारण सोमवारी सकाळी बीड जिल्हा कारागृहात बबन गिते समर्थक (Baban Gite) आणि परळीतील सोनावणे-फड गँग यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. यावेळी संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) यांनाही मारहाण करण्यात आल्याची कुजबुज रंगली आहे. बीड जिल्हा कारागृह प्रशासनाने हा दावा फेटाळला असला तरी हा तुरुंग आता टोळीयुद्धाचा हॉटस्पॉट बनण्याची चिन्हं दिसत आहेत.
बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांना वेगवेगळ्या बराकीत ठेवले जाते. पण सकाळी 10.30 ते 11 दरम्यान तुरुंगातील बंदी उठवली जाते. या काळात सर्व कैद्यांना तुरुंगात मोकळे सोडले जाते. याच काळात परळीतील (Parli News) दोन गट आमनेसामने आले. सध्या फरार असलेल्या बबन गिते यांचा समर्थक महादेव गिते आणि सोनावणे-फड गँगच्या सदस्यांमध्ये हाणामारी झाली. बराचवेळ तुरुंगात ही धुमश्चक्री सुरु असल्याचे समजते. यामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांनाही मारहाण झाल्याची चर्चा आहे.
जेल प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, तुरुंगातील (Beed Jail) बंदी उठवण्यात आली होती तेव्हा दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. तुरुंगातील अधिकारी सध्या हाय अलर्टवर आहेत. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पोलीस अधिकारी या घटनेची माहिती घेत आहेत. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड जिल्हा कारागृहात आणले तेव्हाच अशाप्रकारचा वाद होऊ शकतो, अशी शंका अनेकांना होती. ही शंका अखेर खरी ठेवली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी बीड जिल्हा कारागृहात तणावपूर्ण शांतता असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांचे म्हणणे काय?
बीड जिल्हा कारागृहातील पोलिसांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. महादेव गीते आणि सोनावणे-फड टोळीत फोन लावण्यावरुन वादावादी झाली. याचे पर्यवसन हाणामारीत झाले. यामध्ये वाल्मिक कराड याचा काहीही संबंध नाही. कोणीही जखमी नाही कोणालाही इजा नाही, अशी माहिती कारागृह पोलिस महासंचालक जालिंदर सुपेकर यांनी दिली.
आणखी वाचा
बबन गिते गँगने बीड जेलमध्येच डाव साधला, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला धुतला, सुरेश धस यांचा दावा!
Beed: मोठी बातमी: वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा, बबन गीते समर्थकांची कारागृहातच हाणामारी




















