SambhajiRaje Wikipedia | छत्रपती संभाजीराजेंवरील विकीपीडियावरचा मजकूर कुणी बदलला?
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरलाय. या सिनेमानं अवघ्या चार दिवसात दीडशे कोटींची कमाईदेखील केली. मात्र एकीकडे सिनेमाची ही घोडदौड सुरु असताना दुसरीकडे विकिपीडियावर मात्र संभाजीराजेंची बदनामी होत असल्याचं समोर आलंय. त्यात अभिनेता कमाल खाननं यानं हा वादग्रस्त मजकूर शेअर केला आणि वादाची ठिणगी पडली. एबीपी माझाच्या बातमीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पाहूयात या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट...
संभाजीराजेंच्या जीवनावर आधारित'छावा'
सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय...
छत्रपती संभाजीराजेंचा पराक्रम, त्यांचं बलिदान
हे सगळं भव्य पडद्यावर पहिल्यांदाच दाखवण्यात आलं...
त्यामुळे संभाजीराजेंचा इतिहास सर्वदूर पोहोचला...
पण छावा रिलीज झाल्याच्या अवघ्या चौथ्या दिवशी
कुणीतरी संभाजीराजेंची बदनामी करणारा मजकूर विकिपीडियावर अपडेट केला...
नेहमीच वादाच्या गर्तेत राहणारा अभिनेता कमाल खाननं एक्स पोस्टवर तो आक्षेपार्ह मजकूर शेअर केला
आणि वादाची ठिणगी पेटली...
कमाल खाननं
१७ फेब्रुवारीला केलेली ही एक्स पोस्ट...
पोस्टमधला मजकूर वाचून कोणत्याही शिवप्रेमी आणि शंभूप्रेमीच्या मनात संतापाची लाट उसळेल
पण यामागचे संदर्भ शोधले असता स्टीव्हर्ट गॉर्डनचं THE MARATHAS,
जेम्स लेनचं शिवाजी द हिंदू किंग अशा अनेक पुस्तकांचा संदर्भ दिसून येतो...
मात्र सगळ्या प्रकारावरुन राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या...
मुख्यमंत्री फडणवीसांनी याची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले...
(विकिपीडियावर आक्षेपार्ह लिखाण केलेलं यासंदर्भात आयजी सायबर यांना सांगितलं आहे विकिपीडियावर संपर्क करत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ऐतिहासिक गोष्टी तोडून मोडून करण्यापेक्षा नियमावली तयार करा अशा सूचना आपण देऊ.))
फडणवीसांच्या आदेशानंतर तातडीनं
महाराष्ट्र सायबर सेलनं विकिपीडिया फाऊंडेशनला नोटीस धाडत
आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची मागणी केली...
दुसरीकडे नितेश राणेंसह इतर नेत्यांनीही
यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेतला...
काय आहे विकीपीडिया?
------------------------------------
विकीपीडिया हे इंटरनेटवरील मुक्त व्यासपीठ आहे
लोकांनी लोकांसाठी तयार केलेला हा माहितीचा कोष आहे
यात अपलोड होणाऱ्या मजकुरात विकीपीडियाचा हस्तक्षेप नसतो
सर्वसामान्य कंटेंट क्रिएटर आणि अगदी तुम्ही आम्ही सुद्धा यात माहिती अपलोड करु शकता
पण ही माहिती अपलोड करताना त्या माहितीचा संदर्भ द्यावा लागतो
त्यासाठी विकीपीडियाचे निकष ठरलेले असतात
ही माहिती पडताळून पाहणारेही सर्वसामान्यांमधलेच असतात
माहिती पडताळणी किंवा छाननीसाठी विकीपीडियाची कोणतीही यंत्रणा नाही
याच कारणामुळे विकीपीडियावर अपलोड झालेल्या मजकुराची जबाबदारी निश्चित करता येत नाही
माहितीसंदर्भात कुणी आक्षेप घेतल्यास तर तो मजकूर हटवला जातो
चुकीची किंवा अर्धवट माहिती अपलोड करणाऱ्यांचं खातं निष्क्रिय होतं
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या पहिल्या बजेटमध्ये विकीपीडियाचे संदर्भ दिल्याने त्यांच्यावर टीका झाली होती...
पराक्रमी संभाजीराजे
--------------------------------------------
संभाजीराजेंना अवघं ३२ वर्षांचं आयुष्य लाभलं
ते पराक्रमी आणि प्रचंड बुद्धिमान होते
संभाजीराजे संस्कृत पंडित होते, त्यांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथही लिहिला
संभाजीराजेंना अनेक भाषांचं ज्ञानही होतं
पराक्रमी संभाजीराजेंनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याच्या सिद्दीसह अनेक परकीय आक्रमणं परतवून लावली
अफाट मुघल सैन्याशी संभाजीराजेंनी धीरोदत्तपणे लढा दिला
अखेर औरंगजेबाच्या अटकेत असताना संभाजीराजेंचा अनन्वित छळ झाला
पण औरंगजेबासमोर संभाजीराजे झुकले नाहीत
इतिहासात संभाजीराजेंच्या पराक्रमाची, त्यागाची नोंद आहे...
मात्र हाच इतिहास विद्रुप करण्याचा आणि संभाजीराजेंची बदनामी करण्याचा प्रयत्न अशा प्रकारे सुरु आहे...
सोशल मीडियात त्याला हवा देणारी कमाल खानसारखी मंडळी आहेत
पण हे असले प्रकार थांबवणं आणि ते करणाऱ्या विकृत प्रवृत्तींवर कारवाई होणं गरजेचं आहे...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows

































