ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1PM 31 March 2025
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1PM 31 March 2025
औरंगजेबाच्या कबरीचा विषय अनावश्यक, त्याचा मृत्यू इथे झाल्यामुळेच कबर बनली, कबरीवरुन आक्रमक झालेल्या भाजप नेत्यांना संघाच्या भय्याजी जोशींचा सल्ला..
पंतप्रधान मोदींचा वारस महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, खासदार संजय राऊतांचं भाकित, तर २०२९मध्ये पंतप्रधान म्हणून मोदींकडेच पाहतोय, देवेंद्र फडणवीसांचं भाष्य
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर सोनिया गांधींचा हल्लाबोल, आरएसएसच्या अजेंड्यासाठी शिक्षणाचं भगवीकरण, सोनियांचा आरोप.. तर मेकॉलेप्रणित शिक्षणव्यवस्थेचं भारतीयीकरण होत असल्याचं फडणवीसाचं उत्तर
कॉमेडियन कुणाल कामराच्या उपस्थितीविषयी साशंकता.. कुणाल कामराचा पोलिसांशी कसलाही संपर्क नाही.. कामरा आज दिवसभरात हजर झाला नाही तर तिसरं समन्स जारी करण्याची शक्यता
नोटबंदीच्या आठ वर्षानंतरही डीसीसी बँकांकडे एकशे एक कोटींच्या जुन्या नोटा पडून, नोटा बदलून देण्यास रिझर्व बँकेचा नकार, पुणे डीसीसीकडे बावीस तर सर्वाधिक पंचवीस कोटी कोल्हापूर डीसीसीकडे पडून























