एक्स्प्लोर
हिरवा निसर्ग हा भवतीने...गावताचा शालू, फेसळणाऱ्या धबधब्यांनी रघुवीर घाट नटला!
सातारा आणि रत्नागिरीला जोडणारा खेड तालुक्यापासून 25 किलोमीटरवर असलेला सह्याद्री कुशीतील नागमोडी वळणाचा रघुवीर घाट.

Raghuveer Ghat
1/9

सातारा आणि रत्नागिरीला जोडणारा खेड तालुक्यापासून 25 किलोमीटरवर असलेला सह्याद्री कुशीतील नागमोडी वळणाचा रघुवीर घाट.
2/9

सह्याद्रीच्या उंचच उंच रांगांवर पावसाळ्यात काळ्या कपारीवर उगवलेल्या हिरव्यागार गवताच्या शालूने आणि त्यात फेसळणारे धबधब्यांनी पर्यटकांनी भुरळ घातली आहे.
3/9

नागमोडी वळणातून प्रवास करताना शेकडो प्रवाहित झालेले धबधबे आपल्याला पाहायला मिळतील. या फेसाळणाऱ्या धबधब्यांचा मनमुराद आनंद पर्यटक तिथे थांबून लुटत आहेत.
4/9

याच नागमोडी वळणातून प्रवास करीत पुढे-पुढे जात असतांना दाट धुक्याची चादर सरवत्र पसरलेली आपल्याला दिसते.जणू काही स्वर्गच धरतीवर अवतरलाय का याचा भास होतो.
5/9

एका बाजूला शिरगाव-खोपीच डूबी धरण तर दुसऱ्या बाजूला उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा यातून उडणारे तुषार जणू काही गगनाला गवसणी घालतात.
6/9

सह्याद्रीच्या पर्वत रांगातून फेसळणारे असंख्य धबधबे खळखळत वाहत वाहत शिंदी गावातील नदीला मिळतात.
7/9

या रघुवीर घाटाची सफर म्हणजे एक अविस्मरणीय वर्षा सहल. या ठिकाणी जिल्ह्यातील तसेच जिल्हा बाहेरील शेकडो पर्यटक मौज मजा करण्यासाठी इथे येतात.
8/9

मात्र या घाटातील मार्गावर पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे पर्यटकांनी अतिउत्साही पणा न करता आपली काळजी घेतली पाहिजे.
9/9

निसर्गाने कोकणाला भरभरुन दिले आहे. त्यात पावसाळ्यात कोकणातील निसर्ग सौदर्य पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते.
Published at : 17 Jul 2023 10:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
भारत
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
