एक्स्प्लोर
परवेज मुशर्रफ यांचं दिल्लीत गेलं होतं बालपण, ताजमहाल भेट अन् बरंच काही- पाहा फोटो
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं आज निधन झालं.

Pervez Musharraf
1/10

Pervez Musharraf Death : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं आज निधन झालं. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
2/10

15 जुलै 2001 रोजी आग्रा येथे अटल बिहारी वाजपेयी यांनी परवेज मुशर्रफ यांचं स्वागत केले होते.
3/10

2001 मध्ये परवेज मुशर्रफ भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी आग्रा येथे त्यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली होती.
4/10

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय आणि व्यापारी संबंधावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.
5/10

भारत दौऱ्यावर आलेल्या परवेज मुशर्रफ यांनी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली होती. त्यावेळी त्यांची पत्नीही सोबत होते.
6/10

परवेज मुशर्रफ आणि त्यांच्या पत्नी यांनी आग्र्यातील ताजमहलला भेट दिली होती. दोघेंनी फोटोही काढले होते.
7/10

2001 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या परवेज मुशर्रफ यांनी दिल्लीतील नहर वाली हवेली येथे भेट दिली होती. नहर वाली हवेली येथे परवेज मुशारफ यांचं बालपण गेले होते. दर्यागंज येथे त्यांचा जन्म झाला होता. नहर वाली हवेली येथे त्यांनी अनारो देवी यांची भेट घेतली होती.
8/10

2005 मध्ये परवेज मुशर्रफ भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांची नवी दिल्ली येथे त्यांनी भेट घेतली होती.
9/10

मनमोहन सिंह आणि परवेज मुशर्रफ यांच्यात विविध विषयावर चर्चा झाली होती.
10/10

13 फेब्रुवारी 2006 रोजी लाहोरमधील गदाफी स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय सामना झाला होता. सामन्यानंतर परवेझ मुशर्रफ यांनी एमएस धोनीची भेट घेतली होती.
Published at : 05 Feb 2023 06:52 PM (IST)
Tags :
Pervez Musharrafअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
अर्थ बजेटचा 2025
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
