आधी म्हणाला मुंबापुरी सोडणार, आता करून दाखवलं, अनुराग कश्यपचा मुंबईला रामराम, बॉलिवूडला सोडून 'या' शहरात बस्तान हलवलं!
Anurag Kashyap : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यपने शेवटी मुंबई शहर सोडले आहे. याबाबत त्यानेच माहिती दिली आहे.

Anurag Kashyap : प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने त्याच्या दर्जेदार चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केलेली आहे. त्याच्या चित्रपटांचे चित्रीकरण, चित्रपटांत हाताळलेले विषय हे इतर दिग्दर्शकांपेक्षा वेगळे असतात. त्यामुळेच त्याचे चित्रपट पसंत करणारा एक वेगळा रसिकवर्ग आहे. आतापर्यंत त्याने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्याने मुंबई सोडणार असल्याचे म्हटले होते. आता त्याने प्रत्यक्षपणे मुंबई शहर सोडल्याचे म्हटले जात आहे. आता तो दुसऱ्या शहरात राहायला गेल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई शहर सोडणार असल्याचं केलं होतं सूतोवाच
अनुराग कश्यपने मुंबई शहर सोडले आहे. आता तो बॉलिवूडपासून दूर गेल्याचं सांगितलं जात आहे. त्याने आतापर्यंत गँग्स ऑफ वासेपुर, गँग्स ऑफ वासेपूर-2, देव डी असे दर्जेदार चित्रपट केलेले आहेत. मात्र अनुराग गेल्या बऱ्याच वर्षांपासून बॉलिवूडवर कायम टीका करत आला आहे. नफोखोरीमध्ये चित्रपटांचा दर्जा खालावला आहे. सध्याची सिनेसृष्टी फक्त आर्थिक नफ्याच्या मागे लागलेली आहे. आता सिनेमाकडे कला म्हणून कोणीही पाहात नाहीये, अशी तक्रार तो नेमही करतो. आता अनुराग कश्यपने मुंबई सोडल्याचे म्हटले जात आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने मी मुंबई शहर सोडणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता त्याने प्रत्यक्षपणे मुंबई शहर सोडले आहे.
सिनेजगतातील सर्जनशीलता संपली आहे
मिळालेल्या माहितीनुसार अनुराग कश्यप आता बंगळुरू शहरात शिफ्ट झाला आहे. अनुराग कश्यपने नुकतेच 'द हिंदू'ला मुलाखत दिली. यात त्याने मुंबई शहर सोडल्याचा उल्लेख केलाय. 'मी मुंबई शहर सोडले आहे. मला सिनेसृष्टीतील लोकांपासून दूर राहायचे आहे. कारण सिनेसृष्टी आता फारच विषारी झाली आहे. तेथे प्रत्येकजण अवास्तव टार्गेटच्या मागे धावत आहे. प्रत्येकजण 500 किंवा 800 कोटी रुपयांचे चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न करतोय. सिनेजगतातील सर्जनशीलता आता संपली आहे,' असे अनुरागने म्हटले आहे.
View this post on Instagram
अनुराग कश्यप बंगळुरूत शिफ्ट झाला?
मी आता नव्या घरात शिफ्ट झालोय, असे अनुराग कश्यपने सांगितलेय. विशेष म्हणजे त्याने या घराचा किराया अगोदरच देऊन टाकला आहे. मात्र तो नेमका कुठे राहायला गेला आहे, याबाबत त्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. त्याच्या जवळच्या सूत्रांनुसार त्याने आपले बस्तान आता बंगळुरू शहरात हलवले आहे.
हेही वाचा :























