Maharashtra Live Updates: धनंजय मुंडे यांच्याकडील खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे राहणार
Maharashtra live blog updates in Marathi: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.

Background
Maharashtra live blog updates in Marathi: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सध्या सुरु आहे. अधिवेशनात आजचा दिवस राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावरील कारवाईच्या मुद्यानं गाजू शकतो.तर, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ करमाळा शहरात कडकडीत बंद
सरपंच संतोष देशमुख हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ करमाळा शहरात व तालुक्यात कडकडीत बंद
करमाळा बंदला 100 टक्के प्रतिसाद
करमाळा शहरात व तालुक्यातील मुख्य बाजारपेठा असलेल्या जेऊर,केम,कंदर आदि 25 गावात देखील कडकडीत बंद
आमदार धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याची सकल मराठा समाजाची मागणी
डोंबिवली एमआयडीसीत महिला कामगाराला मॅनेजरकडून मारहाण
डोंबिवली एमआयडीसीतील एस एस एम्ब्रायडरी कंपनीत महिला कामगाराला मॅनेजरकडून मारहाण.
महिलेच्या पोटात ,गुप्तांगणात लाथा मारत अश्लील भाषेत शिवीगाळ करत केली बेदम मारहाण.
मॅनेजर रंजीत भगवान आगवणे,सुपरवायझर विजय दौलत बेडल यांच्याकडून बेदम मारहाण.
अधिक काम मागितल्याने कंपनी मॅनेजरने महिला कामगारा लाथाबुक्क्यांनी केली बेदम मारहाण.
जखमी महिलेवर डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू.
डोंबिवली मानपाडा पोलिसांनी मॅनेजर सह सुपरवायझर वर विनयभंग मारहाणीचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.
मॅनेजर रंजीत भगवान आगवणे,सुपरवायझर विजय दौलत बेडल या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
























