Shani Dev : 29 मार्चनंतर 'या' 3 राशींवर असणार शनीच्या साडेसातीचा खतरा; तब्बल 7 वर्ष सोसावे लागतील कष्ट, होणार प्रचंड हाल
Shani Dev 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मीन राशीत शनीने संक्रमण करताच कोणकोणत्या राशींच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

Shani Dev 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये शनीला (Shani Dev) सर्वात क्रूर ग्रह मानलं जातं. शनी (Lord Shani) एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करत असताना अनेक राशींच्या लोकांवर त्याचा शुभ-अशुभ परिणाम होतो. त्यानुसार, 29 मार्च रोजी रात्री 9 वाजून 44 मिनिटांनी शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे. शनीच्या या संक्रमणामुळे 3 राशींच्या लोकांवर सतत धोक्याची घंटा असणार आहे. या राशींसाठी हा काळ फार कठीण होऊ शकतो. कारण या राशींच्या लोकांवर ढैय्यासह साडेसातीचाही प्रभाव असणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मीन राशीत शनीने संक्रमण करताच कोणकोणत्या राशींच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
सर्वात आधी 29 मार्च रोजी शनीचं संक्रमण मीन राशीत होणार आहे. या दरम्यान, शनी देव पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि मीन राशीत संक्रमण करणार आहे. तर, 13 जुलै रोजी शनी मीन राशीत वक्री होणार आहे. म्हणजेच शनीच्या उलट्या चालीचा प्रारंभ होणार आहे. तर, 28 नोव्हेंबर रोजी शनी मीन राशीत मार्गी होणार आहे. या दरम्यान शनी सरळ चाल चालणार आहेत.
'या' राशींवर असणार साडेसातीचा प्रभाव
मेष रास (Aries Horoscope)
मीन राशीत शनीच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु होईल. या राशीच्या लोकांवर 7 वर्ष 2 महिने आणि तीन दिवस शनीच्या साडेसातीचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. विशेषत: करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत सतर्क रहा.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीच्या राशी संक्रमणाच्या दरम्यान कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असणार आहे. या राशीच्या लोकांवर तब्बल दोन वर्ष दोन महिने आणि सहा दिवसांपर्यंत शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागणार आहे. या काळात तुम्हाला शारीरिकसह मानसिकरित्याही त्रास सहन करावा लागणार आहे. तुमच्या घरात देखील वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांवर देखील शनीच्या साडेसातीचा प्रभाव असणार आहे. या राशीच्या लोकांवर 4 वर्ष 4 महिने आणि 11 दिवसांपर्यंत शनीच्या दु्ष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमच्या वैयक्तिक जीवनात अनेक मोठ्या घटना तुमच्याबरोबर घडतील. त्यामुळे तुमच्यासाठी हा काळ कठीण असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















