Astrology : आज वेशी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; सिंहसह 'या' 5 राशींच्या सुख-समृद्धीत होणार वाढ, भगवान विष्णूंची असणार कृपादृष्टी
Astrology Panchang Yog 6 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 6 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस गुरुवार म्हणजेच दत्तगुरुंचा असणार आहे. तसेच, आज फाल्गुनी पक्षाची षष्ठी तिथी आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. तसेच, आजच्या दिवशी वेशी योगासह (Yog) अनेक शुभ संयोग जुळून येणार आहेत. तसेच, आजच्या दिवशी काही राशींच्या लोकांवर भगवान विष्णूची कृपा असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मकतेचा असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे. तसेच, आजच्या दिवसात तुम्ही एखादं महत्त्वाचं कार्य हाती घ्याल. हे काम पूर्ण करण्यात तुम्हाला वरिष्ठांचा चांगला पाठिंबा पाहायला मिळेल. तुमच्या पगारात देखील लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमची महत्त्वाची कामे पार पाडू शकता. तसेच, एखादं काम पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला खूप आनंद झालेला असेल. काही खास लोकांबरोबर तुमच्या गाठीभेटी होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. भगवान विष्णूची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रभावशाली असणार आहे. आज तुमची काहीतरी नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती दिसून येईल. तसेच, कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला पाहायला मिळेल. जोडीदाराबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाचा विस्तार करु शकता.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मान-प्रतिष्ठेचा असणार आहे. आज तुम्हाला समाजात चांगला मान-सन्मान पाहायला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, अप्रात्यक्षिकपणे तुम्हाला धनलाभ मिळेल. भगवान विष्णूची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. आज तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला नवीन गोष्टी शिकता येतील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तसेच, तुमच्या कामात, व्यवसायात तुम्हाला प्रगतीची चांगली संधी मिळेल. तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला दिसेल. सरकारी योजनांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ मिळेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















