एक्स्प्लोर

Bird Flu : धाराशिवमध्ये कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लूचा संसर्ग, धोका वाढल्याने एक किलोमीटरच्या कक्षेतील कोंबड्या संपवणार

Bird Flu : धाराशिवमध्ये कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लूचा संसर्ग पसरल्याचे उघडकीस आले आहे. बर्ड फ्ल्यूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

Bird Flu : धाराशिवमध्ये (Dharashiv) कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही (Chickens) बर्ड फ्लूचा संसर्ग पसरल्याचे उघडकीस आले आहे. बर्ड फ्ल्यूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले असून ढोकी गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत. जलद कृती दलाच्या माध्यमातून कोंबड्या नष्ट करायला सुरुवात झाली आहे. 
 
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे कावळ्यांद्वारे ‘बर्ड फ्यू’ झाल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर प्रशासनाच्या माध्यमातून परिसरातील  किमी अंतरावरील गावांतील कोंबड्यांचे देखील सर्वेक्षण करण्यात आले होते. यानंतर कोंबड्यांचे स्वॅब तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या तपासणीत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने बुधवारपासून पाच पथकांच्या माध्यमातून कोंबड्या नष्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 

पशुसंवर्धन विभागाचे आवाहन 

कोंबड्यांचा अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्यानंतर यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वेक्षणात आढळून आलेल्या तब्बल ८५० हून अधिक कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. पाच पथकांच्या माध्यमातून हे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. ढोकी गावापासून एक किलोमीटर अंतरावरील कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत. त्यानंतर तीन किलोमीटर परिसरातील कोंबड्याचे सॅम्पल घेतले जाणार आहे. कोंबड्या लपवून ठेवू नका किंवा नातेवाईकांना देऊ नका, नष्ट करायला मदत करा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. कोंबड्यांना संसर्ग आढळून आल्याने ढोकी गावात मास विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. 

वाशिममध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग 

वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जीरापुरे येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर वाशिम जिल्हा प्रशासनाने तातडीनं उपाययोजना सुरु केल्या. बर्ड फ्लू बाधित सर्व कोंबड्यां आणि खाद्य शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. यामुळे मागील 24 तासात वाशिम जिल्ह्यात इतरत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाल्याची नवीन घटना उघडकीस आली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Mumbai Crime News: मुंबई हादरली! जोगेश्वरीत 12 वर्षांच्या शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार, मानसिक धक्का बसल्याने दादर रेल्वे स्थानकात वेड्यासारखी फिरत राहिली

Raigad guardian minister: रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद टोकाला पोहोचला, शिंदे गटाच्या आमदाराकडून सुनील तटकरेंना आलमगीर औरंगजेबाची उपमा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget